Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा गोळीबार प्रकरण : अवघ्या दोन तासात दोन आरोपीना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवघ्या दोन तासात दोन आरोपीना अटक देशी पिस्टल व तीन राउंड जिवंत गोळ्या जप्त सलाम पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाला - कुणी रेल्वेने तर कुणी कंबरपाण...
अवघ्या दोन तासात दोन आरोपीना अटक
देशी पिस्टल व तीन राउंड जिवंत गोळ्या जप्त
सलाम पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाला - कुणी रेल्वेने तर कुणी कंबरपाण्यात कर्तव्य बजावले
पोलिसांनी पत्रकारांना दिली माहिती, वाचा सविस्तर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २४ जुलै २०२३) -
        मागील आठ्वड्यापासून जिल्ह्यात आलेल्या पावसाने प्रशासन आपली यंत्रणा राबवित असताना आलेल्या पुराने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते, अश्यातच राजुरा तालुक्याचा जिल्ह्याशी रस्ता मार्गाने संपर्क तुटला असताना त्यातच रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान स्थानिक आठवडी बाजार वार्डात राहणारे भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे (sachin dohe) यांच्या घरी गोळीबार झाला, त्यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा (वय २७) हीचा मृत्यू झाला होता. आठवडी बाजार वॉर्डात राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली याचा लक्षात येताच तो रात्री भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने पूर्वशा डोहे हिला मान आणि छातीच्या मधल्या भागात गोळी लागल्याने त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली, मारेकरी दुचाकीवर होते. हि वार्ता वाऱ्यासारखी पसरली व शहरात एकच खळबळ उडाली. (Country pistol seized, total four rounds fired) (rajura)

         घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चार चमू तयार केल्या एका चमूला दवाखान्यात तर अन्य चमूला तपासकार्यात लावले आणि अवघ्या दोन तासात पोलिसांनी एक नाबालिग व एक लवज्योतसिंह देवल वय १९ वर्षे सोमनाथपूर वॉर्ड राजुरा याना अटक केली. आरोपीकडून देशी पिस्टल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल मधून चार राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी पिस्टल मधून तीन राउंड जिवंत गोळ्या जप्त केल्या. मृतक पूर्वशा हिला एक गोळी माने आणि छातीच्या मधात लागल्याने ती तिथेच कोसळली तर लल्ली ला पाठीला गोळी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लल्ली ने मारेकऱ्याचा भावाला दोन वर्षाआधी मारहाण केली होती तो राग आरोपीचा मनात होता जुन्या वैमनस्यातून हे प्रकरण झालं. मात्र मृतक पूर्वशा हिचा दुर्दैवाने गोळी लागल्याने तिचा निष्पाप बळी गेला. (Rajura Police Station)

        लल्ली ला ग्रामीण रुग्णालय राजूरात आणण्यात आले होते. मात्र त्याला चंद्रपूरला पाठविण्यात आले मात्र नदीला पूर असल्याने लल्ली ला एम्बुलन्स ने राजुरा वरुन गोवरी मार्गाने माथरा गावाच्या पूर्वी रेल्वे मार्ग होता तो यावर्षी काढण्यात आला तेथून रस्ता तयार करण्यात आला होता त्यामार्गाने चारचाकी वाहन सास्ती कोळसा खाण परिसरातून जाऊ शकते त्यामार्गाने चंद्रपूर पाठविण्यात आले. लल्लीचा तेथे उपचार सुरू आहे. 

सलाम पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाला, कुणी रेल्वेने तर कुणी कंबरपाण्यात कर्तव्य बजावले
        ह्या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. नदीत पूर असल्याने चंद्रपूर वरून पोलीस अधिकारी व पोलिसांना बोलावणे कठीण होते तरी सुद्धा कार्यकर्तृत्वाची जाण असलेल्या पोलिसांनी पाण्यातून, चिखल तुडवत, कुणी रेल्वेने राजुरा गाठले आणि कायदा व्यवस्था राखण्यात भूमिका बजावली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू (Additional Superintendent of Police Reena Janbandhu) घ्या प्रकरणात लक्ष देत आहेत. परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक विशाल नागरगोजे (Police Inspector Vishal Nagargoje under review) यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, ओमप्रकाश गेडाम, सदानंद वराडकर, तिरुपती जाधव, खुशाल टेकाम, राज भिंगेवार, शेखर माथनकर, महेश कोंडावार ह्यांचे नेतृत्वातील पथकाने तत्काळ तपास हाती घेऊन मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांना आरोपीना अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश मिळाले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम ३०२, ३०७, ३४ मुंबई पोलीस अधिनियम १३५ व भारतीय हत्यार कायदा ३/२५ अन्वये गुन्हा नोंद केला, समोरील तपास सुरु आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top