Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सानुग्रह निधी, रस्ते निधी, कंत्राटी अभियंते, आरोग्य सेवकांचे वेतन द्या, आरोग्य सेवा सक्षम करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बार्टी अंतर्गत विद्यार्थ्यांना निट, जेईई चे प्रशिक्षण द्या, मातंग व तत्सम समाजाच्या मागण्या पूर्ण करा आमदार सुभाष धोटे यांची विधिमंडळात मागण...

बार्टी अंतर्गत विद्यार्थ्यांना निट, जेईई चे प्रशिक्षण द्या, मातंग व तत्सम समाजाच्या मागण्या पूर्ण करा
आमदार सुभाष धोटे यांची विधिमंडळात मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २५ जुलै २०२३) -
        महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी पुरवनी मागण्यांवरील चर्चेदरम्यान राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध ज्वलंत समस्यांवर प्रश्न उपस्थित करून राज्य शासनाने आपल्या क्षेत्रातील या अत्यंत ज्वलंत समस्या विशेष प्राधान्य देऊन सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली. (Sessions of Maharashtra Legislature)

        आ. धोटे यांनी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शासकीय धोरणानुसार पात्र राजुरा क्षेत्रातील २० ग्रामपंचायत मधिल पोलीस पाटील व इतर कर्मचार्यांना सानुग्रह निधी अजूनही मिळालेला नाही, तो देण्यात यावा. राजुरा मतदार संघात अनेक निर्मानाधिन रस्त्यांची कामे निधी अभावी रखडलेली आहेत. तेव्हा येथे आवश्यक निधी उपलब्ध करून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी. बार्टी अंतर्गत इयत्ता १०  वीतील ९० % पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निट व जेईई चे प्रशिक्षण देण्याचे धोरण सरकारने ठरविले असून त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही तेव्हा सरकारने हे महत्वाचे काम पुर्ण करून गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. आरएचई अभियंते, कंत्राटी आरोग्य सेवकांचे वेतन अनेक दिवसांपासून मिळालेले नाहीत ते आमच्या कडे येऊन निवेदनाद्वारे मागणी करीत आहेत, यासर्वांना तातडीने त्यांच्या मेहनतीचा कष्टाचा मोबदला देण्यात यावा, त्यांच्या कुटुंबीयांवर येणारी उपासमारीची वेळ टाळावी. क्षेत्रात गोंडपीपरी येथे ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच गोंडपीपरी व जिवती येथे आरोग्य विभागात आवश्यक पदे निर्माण करावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, जिवती सारख्या आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम भागात तर याला विशेष प्राधान्य देण्यात यावे आणि आरोग्य सेवा सक्षम करण्यात यावी, घरकुल योजनेतील निधी देताना शहरी व ग्रामीण अशा भेदभाव करून निधी दिला जातो. तो सारखा करून शहरातील घरकुलांसाठी दिला जातो तेवढाच निधी ग्रामीण भागात द्यावा. श्रावण बाळ, संजय निराधार योजना अशा विविध शासकीय योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीत वाढत्या महागाईचा विचार करून तो ५ हजार रुपये दरमहा करण्यात यावा. मातंग व तत्सम समाजाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे, मंण्यालयावर मौर्चा काढण्यात आला. सरकारच्या विविध मंत्र्यांना, विरोधी पक्षातील आमदारांना ही निवेदन देण्यात आली. या समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन त्या पुर्ण कराव्यात अशा विविध मागण्यांकडे आ. धोटे यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. (subhash dhote) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top