Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नाल्यात पाय घसरून शेतमजूराचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आवाळपूर येथील घटना   आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत (तालुका प्रतिनिधी) कोरपना (दि. २५ जुलै २०२३) -         परिसरात आज सकाळी पावसाने दमदार हज...

आवाळपूर येथील घटना 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत (तालुका प्रतिनिधी)
कोरपना (दि. २५ जुलै २०२३) -
        परिसरात आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि दुपार होताच आभाळ मोकळे झाले त्यामुळे नाल्याला पाणी आले होते यावेळी शेतातून परत येताना  स्मशान भूमी लगत असलेल्या नाल्यावर पाय घसरून आवाळपूर येथील मनोज महादेव आत्राम वय ३४ वर्ष हा नाल्यात वाहून गेला ही घटना साधारणतः ३.३० वाजता घडली. (aawalpur)

        युवक वाहून गेला याची माहिती हवेसारखी पसरली आणि नाल्यावर लोकांची तोबा गर्दी झाली. गावातील नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने स्वतः पाण्यात उतरत शोधा - शोध सुरू केली. काही अंतरावर ६.३० वाजता मुसळे यांचा शेता लगत त्यांचा मृतदेह आढळला. मनोज यांचा पाठीमागे २ मुले पत्नी, असा आप्तपरिवार असल्याने त्याचा जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top