Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूरात गोळीबार, भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एक गंभीर जखमी - वाचा सविस्तर आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २३ जुलै २०२३) -         राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्ड मध्ये गोळीबा...
एक गंभीर जखमी - वाचा सविस्तर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २३ जुलै २०२३) -
        राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्ड मध्ये गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे (sachin dohe) यांच्या पत्नी ठार झाल्याने गावात हालहाल व्यक्त करण्यात येत आहे. (rajura police station)

        मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथपूर येथे लल्ली शेरगील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळी बार केला. लल्ली शेरगील हा सचिन डोहे यांच्या घरा कडे धावत गेला मारेकरी त्याच्या मागे धावले एवढ्यात सचिन यांच्या घराच्या गेट वर दोन गोळ्या झाडल्या त्या लल्ली शेरगील याना गोळी लागली तेवढ्यात सचिनची पत्नी घरातून बाहेर निघाली तिलाही गोळी लागल्याने तिला तात्काळ गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले डाक्टरनी पूर्वशा डोहे (अंदाजे 27) हिला मृत घोषित केले. विनाकारण एका गृहिणींचा मृत्यू झाला त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर गोळी बार कोळसा तस्करातून झाले असे बोलल्या जात आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top