Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्धा नदी पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकात धाकधुकी वाढली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा-बल्लारपूर, राजुरा सास्ती मार्गे बल्लारपूर, मार्ग बंद असल्याने आता रेल्वेने प्रवास वर्धा नदी पुलावर अनोळखी बालक मिळाले, माहिती देण्याच...
राजुरा-बल्लारपूर, राजुरा सास्ती मार्गे बल्लारपूर, मार्ग बंद असल्याने आता रेल्वेने प्रवास
वर्धा नदी पुलावर अनोळखी बालक मिळाले, माहिती देण्याचे राजुरा पोलिसांचे आवाहन
तहसील प्रशासनाने केली माणिकगड स्टेशन ला रेल्वे चा थांबा देण्याची विनंती 
जिल्हाधिकाऱ्यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी
कोरपना तालुक्यातील अंतरगाव, परसोडा, रायपूर, पारडी, अकोला, कोडशी बू,/खू , जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा, सांगोडा, कारवाई, इरई, भारोसा, तुळशी गावे पूरबाधीत
वाचा सविस्तर माहिती
आमचा विदर्भ - टीम (दीपक शर्मा/अनंता गोखरे/धनराजसिंह शेखावत/राजेश अरोरा)
चंद्रपूर / बल्लारपूर / राजुरा / कोरपना (दि. २३ जुलै २०२३) -
        गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. (District Collector inspected the flood affected area in Ballarpur taluka)

        तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना करताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, पुरामध्ये अडकलेल्या गरजू व्यक्तींना तत्काळ मदत करावी व त्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याची व्यवस्था करावी. शेतपिकाच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे पूर्ण करावेत. पूरग्रस्त गावामध्ये तसेच नगर परिषद क्षेत्रामध्ये आरोग्य व पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी व निर्जंतूकीकरण करावे. डास व इतर कीटक वाढू नये, यासाठी आवश्यक ती कीटकनाशक फवारणी करावी. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

        यावेळी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, मुख्याधिकारी विशाल वाघ, गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, शिक्षणाधिकारी बोरीकर, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, मंडळ अधिकारी सुजित चौधरी आणि तलाठी शंकर खरुले उपस्थित होते. 
पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी जिल्हाधिकारी
        वर्धा नदी पुलावर पाणी आल्याने शुक्रवार दि. २१ जुलै ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान गडचांदूर-भोयगाव मार्ग बंद करण्यात आला होता त्यामुळे त्यामार्गाने घुघुस चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांना राजुरा मार्गे जावे लागत होते मात्र पुन्हा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान राजुरा-बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आज दुपारी जवळपास १२.३० वाजताच्या दरम्यान राजुरा-बल्लारपूर व्हाया धोपटाला-सास्ती मार्गही बंद झाल्याने आता राजूराचा रस्ता मार्गाने जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. पोलिसांनी या दोन्ही पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवला असून तहसील प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. 

हे मार्ग आहेत बंद
        राजुरा-बल्लारपूर, लाठी-विरुर, हडस्ती-चारवट आणि कोरपना तालुक्यातील भोयगाव-धानोरा, कोडशी-पिपरी, वनसडी-अंतरगाव, पारडी-खातेरा मार्ग बंद झाले आहे. कोरपना तालुक्यातील अंतरगाव, परसोडा, रायपूर, पारडी, अकोला, कोडशी बू,/खू, जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा, सांगोडा, कारवाई, इरई, भारोसा, तुळशी ही गावे पूरबाधीत आहे. पैनगंगा नदी ने रौद्र रूप धारण केल्याने पैनगंगा कोळसा खाणींचे काम खबरदारीची बाब म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. (Rajura-Ballarpur, Ballarpur via Rajura Sasti, now travel by rail as the route is closed)

माणिकगड स्टेशन मास्टरशी संवाद साधताना तहसीलदार ओमप्रकाश गोंड
तहसीलदाराने घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट, रेल्वे थांबविण्याची सूचना
        राजुरा तालुक्यातील पुरामुळे सर्व रस्ते बंद झाले असून तातडीने बल्लारशाह वा चंद्रपूर कडे जाणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीकरिता तहसीलदार ओमप्रकाश गोंड (Tehsildar Omprakash Gond) यांनी माणिकगड रेल्वे स्टेशन मास्टर यांची भेट घेऊन माणिकगड स्टेशनवर रेल्वेचा थांबा देण्याची विनंती केली. यावेळी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी गोरे उपस्थित होते. काही तासाच्या अंतराने काही रेल्वे गाड्या येथे थांबा घेत असून यामुळे जाणे गरजेचे असलेल्या प्रवाश्याना दिलासा मिळाला आहे. आज रविवार असल्यामुळे मात्र आज दुपारी जवळपास तीन तास बल्लारशाह कडे जाणारी रेल्वे न थांबल्याने पुणेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांना स्टेशनवर सोडायला आलेल्या प्रवाश्यांची धाकधुकी वाढली होती. काही प्रवाश्यांनी स्टेशन मास्टर ला काजीपेठ-पुणे गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. काजीपेठ-पुणे गाडीला येथे थांबा देण्यात आल्याने प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले. (The tehsil administration has requested to stop the train at Manikgad station) (Manikghar Railway Station)
माणिकगड रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची चिक्कार गर्दी

वर्धा नदी पुलावर अनोळखी बालक मिळाले, माहिती देण्याचे राजुरा पोलिसांचे आवाहन
        राजुरा-बामणी मार्गावरील पुलाजवळ दिनांक 22 जुलै ला सायंकाळी एक वर्षीय बालक बसुन रडत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी ताबडतोब या विषयी राजुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार डीवायएसपी विशाल नागरगोजे यांना माहिती दिली. पोलिसांनी या बालकाला पोलिस ठाण्यात नेले. मात्र हा एक वर्षीय बालक बोलत नसल्याने काहीच माहिती पोलिसांना मिळाली नाही. अखेर या मुलाला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून चंद्रपूर येथील बाल संगोपन केंद्रात पाठविण्यात आले आहे. (Unidentified child found on Wardha river bridge, Rajura police appeal for information) (Police Station Rajura)
        सध्या वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून आता पुलावरुन पाणी असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. अशा भयावह ठिकाणी एक छोटा मुलगा सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे. हा मुलगा बहुतेक परप्रांतीय मजुराचा असावा असा अंदाज असून कदाचित या मुलाच्या आईने नदीत उडी घेऊन आत्महत्या तर केली नाही ना अशीही शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. (rajura) (korpana) (ballarpur) (wirur station) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top