जिल्ह्यातील 4 जलाशये ओव्हर फ्लो
वाचा जिल्ह्यातील सविस्तर माहिती
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा / चंद्रपूर (दि. २३ जुलै २०२३) -
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस बरसल्याने चंद्रपूर येथे रस्ते व सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातही पावसाने थैमान घातले आहे. वर्धा नदी तुडुंब भरून वाहत असताना वर्धा नदी पुलावर पाणी आल्याने शुक्रवार दि. २१ जुलै ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान गडचांदूर-भोयगाव-घुग्गुस-चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. मात्र पुन्हा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान राजुरा-बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आज दुपारी जवळपास १२.३० वाजताच्या दरम्यान सास्ती-बल्लारपूर मार्गही बंद झाल्याने आता राजूराचा रस्ता मार्गाने जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. पोलिसांनी या दोन्ही पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवला असून तहसील प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. (rajura) (chandrapur)
हवामान विभागाने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यानुसार जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी 12 नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पुन्हा चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील 4 जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या इराई धरणातही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. या धरणात चारगाव धरणातून पाणी सोडण्यात आले. शुक्रवारपर्यंत इरई धरण 52 टक्के भरले होते. या जलाशयाची पाणी साठवण क्षमता 207.500 मीटर असून, वृत्त लिहीपर्यंत या धरणात 205.250 मीटर पाणीसाठा झाला होता. मूल तालुक्यात पावसाने कहर केला. त्यामुळे पाच गावातील 200 घरात पाणी घुसल्याने सामानाची नासधूस झाली. मूल-नागपूर मार्ग सात बंद होता. गोंडपिपरी-मूल मार्गावरील वाहतुक बंद पडली. (wardha River)
दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील लालनाला प्रकल्पातून सातत्याने 411 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत वर्धा नदीचे पाणी बल्लारपूर ते राजुरा मार्गावरील पुलाला टेकले होते. गोसीखुर्द धरणातूनही 5238 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरासरीच्या 40 टक्के पाऊस 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला. मूल तालुक्यात सर्वाधिक 138 मिमी पावसाची नोंद झाली. सावलीत 120 मिमी, पोंभुर्णा 102, गोंडपिपरी 80, ब्रह्मपुरी व नागभीड 65 आणि सिंदेवाहीमध्ये 46 मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे 2022 च्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. मूल-नागपूर मार्ग सात तास बंद चिखलीच्या पुढे नाल्याला चौफेर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. सलग सात तास नागपूर मार्गाची वाहतुक ठप्प पडली असल्याचे मूल तालुका आपत्ती निवारण समितीने सांगितले. वढोली अंधारी नदीला पूर आल्याने गोंडपिपरी-मूल मार्ग बंद पडला आहे. 200 घरात पाणी शिरले
मूल तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मूलसह तालुक्यातील जुनसुर्ला, राजोली, चिखली, सुशी या गावात जवळपास 200 घरांत पाणी शिरले.
जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पूरग्रस्त गावांची पाहणी
गुरुवारी रात्रीपासून मुल तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील हळदी, दहेगाव, नलेश्वर या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचे पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच तहसीलदार रवींद्र होळी व ठाणेदार सुमित परतेकी, नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, यशवंत पवार, नंदकिशोर कुमरे आणि तलाठी महेश कडवलवार महेश पेंदोर उपस्थित होते. (aamcha vidarbha)
जलाशयांची स्थिती
- असोलमेंढा - - 100 टक्के
- चंदई - 100 टक्के
- चारगाव - 100 टक्के
- लभानसराड - 100 टक्के
- इराई - 52 टक्के
- घोडाझरी - 72 टक्के
- नळेश्वर - 55 टक्के
- डोंगरगाव - 92 टक्के
- पकडीगुडम - 40 टक्के
- अमलनाला - 37 टक्के
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.