Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पोलिसाच्या रूपात "भगवान" भेटला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीवरून जीव देण्याऱ्या प्रयत्नात असलेल्या मुलीचे पोलिसाने वाचविले प्राण पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक आमचा विदर्भ - अविना...
वर्धा नदीवरून जीव देण्याऱ्या प्रयत्नात असलेल्या मुलीचे पोलिसाने वाचविले प्राण
पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके (प्रतिनिधी)
विरूर स्टेशन (दि. १ जुलै २०२३) -
        'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीनुसार राजुरातील एक मुलगी वर्धा नदीच्या पुलावरून जीव देण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याच पुलावरून जात असलेल्या पोलिसाच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत पोलिसाने मुलीचे प्राण वाचविल्याने 'त्या' पोलिसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (The police saved the life of the girl who was trying to save her life from the river Wardha)

        मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक मुलगी राजुरा वर्धा नदीच्या पुलावरून पायी जात असतानाचे त्याच पुलावरून मोटारसायकलने जाणारे पोलीस कर्मचारी भगवान पंढरी मुंडे याना दिसली. पोलीस कर्मचारी भगवान मुंडे यांनी आपली मोटारसायकल हळू करत मुलीच्या हालचालीवर लक्ष दिले. सदर मुलगी पुलावरील कठडे ओलांडत असतानाचे पाहत भगवान मुंडे यांनी आपली मोटारसायकल बाजूला सारत त्या मुलीचे प्राण वाचविले. मुंडे यांनी पुलावरून जात असलेल्या अन्य मोटारसायकल वरून जाणाऱ्या महिलांचे सहकार्याने मुलीला समजूत घालत पुलावरून साईड ला नेले व सदर घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली. सदर मुलीला पोलिसाच्या रूपात "भगवान" भेटला अशी चर्चा सुरु असून (Wirur Police Station) विरूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कान्स्टेबल भगवान पंढरी मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (The performance of the police is universally appreciated) (Wirur Station) (rajura)

यापूर्वीही वाचविले लोकांचे जीव
        पोलीस कॉन्स्टेबल भगवान पंढरी मुंडे हे विरूर पोलिस स्टेशन येथे 2017 पासुन कार्यरत असुन ते नेहमी सामाजिक व धार्मिक  कार्यात अग्रेसर असतात. आज आत्महत्या करिता प्रवॄत्त मुलीचे जिव वाचविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत असून यापूर्वी २८ जुलै २०२२ ला रेल्वेतून खाली पडलेल्या एका बिहारी युवकाला आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत रुग्णालयात हलविले होते त्यापूर्वी १३ जुलै २०२२ ला हैदराबाद वरून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने त्या रेस्क्यू मध्ये सुद्धा मुंडे यांनी प्रवाश्यांचे प्राण वाचविले होते. अश्या कर्तृत्ववान पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (Police Constable) (aamcha vidarbha) 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top