Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडेंच्या नेतृत्वात यशस्वी आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोडर भरतीत पाच जणांचा समावेश आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत द्वारे गडचांदूर (दि. २९ जून २०२३) -         कोरपना तालुक्यातील (Ultratech Cement...
लोडर भरतीत पाच जणांचा समावेश
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत द्वारे
गडचांदूर (दि. २९ जून २०२३) -
        कोरपना तालुक्यातील (Ultratech Cement) अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे लोडर भरतीमध्ये सेवानिवृतत्व व मयत झालेल्या लोडरची मुल व इतर कंपनीने दत्तक घेतलेल्या गावातील शिक्षीत बेरोजगारांना त्यांचा हक्काचा रोजगार डावलून एका कामगार संघटनेच्या माध्यमातून पैसे घेऊन लोडर भरती करण्यात येत होती. या भष्ट्राचार व अन्याया विरुद्ध मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त परिवारातील महिलांनी गेल्या सहा दिवसापासून उपोषण आंदोलन सुरु केले. या उपोषण आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने उपोषण कर्त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आज सातव्या दिवशी अल्ट्राटेक कंपनीचे अधिकारी व मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून आंदोलन मागे घेतले. (Loader recruitment includes five persons) (maharashtra navnirman sena)

        आंदोलन यशस्वी झाल्याने मनसे पदधिकारी, नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे (MNS District President Mandeep Rode) यांनी कंपनीला इशारा दिला की यापुढे स्थानिका वर अन्याय केल्यास तीव्र आंदोलन करणार व स्थानिकांना न्याय मिळवून देणार. आंदोलनात मनसे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी मनसे जिल्हाध्य मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात अन्य तालुका अध्यक्ष सुरेश कामडे तथा शहर उपाध्यक्ष सिध्देश्वर या उपोशनात उपोशन कर्ते व महिला पदाधिकारी मनसे सैनिक उपस्थित होते. (Gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top