Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामपंचायत कामगार सेनेचा २० जुलैला मुंबई येथे विधान भवनावर धडक मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १६ जुलै २०२३) -         राज्यात 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी (Gram Panchayat Staff) हे गेल्या ...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १६ जुलै २०२३) -
        राज्यात 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी (Gram Panchayat Staff) हे गेल्या 10 ते 20 वर्षां पासून आपल्या हकाच्या मागणी साठी झटत आहे परंतु राज्य सरकार कर्मचाऱ्यांना तारखी वर तारीख देऊन देत आहे. ग्रामपंचायतचा कर्मचारी याना वेतन श्रेणी नाही आणि जुनी पेन्शन सुद्धा चालू ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लागू नाही. या कर्मचाऱ्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडी सेविकेला 15 हजार पगार आहे. शिक्षकांना 70 ते 80 हजार पगार आहे. ग्राम सेवकांना 70 हजार पगार आहे व त्यांना जून पेन्शन सुद्धा लागू केल आहे मात्र ग्राम पंचायतचा कर्मचाऱ्यांना पेंशनतर नाहीच तर पगारही कमी मिळत आहे. (chandrapur) (aamcha vidarbha)

        फक्त केंद्रीय व राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याकरिता शासनाकडे पैसा आहे मात्र गावात राबणाऱ्या ग्रामपंचायतचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्यासाठी काहीही तरतूद नाही म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार सेना द्वारे विविध मागण्याकरिता २० जुलैला मुंबई येथे विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतील कर्मचाऱ्यांनी दिली. 

प्रमुख मागण्या -
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागु करणे 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन (इ.पी.एफ.) या कार्यालयात करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतन लागु करणे व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे. 
  • जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यामधून एकुण रिक्त पदाच्या १०% प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे.




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top