Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिप माजी सभापती सुनील उरकुडे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखेर कोलगाव वासियांना मिळाले पिण्याचे शुद्ध पाणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १७ जुलै २०२३) -         राजुरा तालुक्यातील वर्ध...

अखेर कोलगाव वासियांना मिळाले पिण्याचे शुद्ध पाणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १७ जुलै २०२३) -
        राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावर वसलेले कोलगाव हे पूर प्रभावित गाव आहे. मागच्यावर्षी जवळपास सतरा दिवस कोलगाव ला पुराच्या पाण्याने वेढले होते अश्या परिस्थितीत लोकांची काळजी करणे व पुरपिढीतांना धान्य वाटप करण्याच्या अनुषंगाने जिप माजी सभापती सुनील उरकुडे गावात गेले होते. त्या गावातील पूर परिस्थिती पूर ओसरून गेल्यानंतरही अत्यंत बिकट झाली होती. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रभावित झाल्याने दूषित पाणी पिल्याने नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत होते. गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता (Water Purification Plant) जल शुद्धीकरण संयंत्र बसवून देण्याची मागणी सौ अनिता पिंपळकर, माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच पुरुषोत्तम लांडे तथा समस्त ग्रामवासियांनी केली होती. मात्र त्यावेळी सुनील उरकुडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता तरीही गावकऱ्यांच्या या रास्त मागणीला मान देत पुढील पावसाळ्याआधी आर.ओ. बसवून देण्याचा शब्द सभापती सुनील उरकुडे (Sunil Urkude) यांनी दिला होता. (Kolgaon residents finally got clean drinking water) (Rajura) (Kolgaon)

        दिलेला शब्द पूर्ण करत कोलगाव येथे जिल्हा निधी अंतर्गत आर.ओ. चे काम मंजूर करून दि. १५ जुलै २०२३ ला काम पूर्ण होऊन आर.ओ.चे  लोकार्पण माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव मधुकर नरड, जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो सचिन डोहे, सरपंच सौ अनिता सुधाकर पिंपळकर, पुरुषोत्तम लांडे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच, भाजप कार्यकर्ते दीपक झाडे, राहुल सूर्यवंशी, जिल्हा युवा नेते अक्षय निब्रड, ग्रापं सदस्य पुष्पा झुंगरे, ममता पोतराजे सदस्या, शंकर पासपुते सदस्य, मारोती भोंगळे, विनोद पोतराजे, रमेश उरकुडे, चंदू दिवसे, राजू पिंपळकर, जगदीश लांडे, प्रशांत मोरे, अजय पिंपळकर, रवींद्र झुंगरे आणि गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनी सुनील उरकुडे यांचे आभार मानले व भविष्यात गावाच्या समस्यांसाठी सहकार्य करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top