आज दुपार पासून अंतरगांव-नारंडा रस्ताही बंद
पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी चालकांचा धाडसपणा जीवावर बेतणार - बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २२ जुलै २०२३) -
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भोयेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचांदूर भोयगाव धानोरा मार्ग काल शुक्रवार दि. २१ जुलै ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान बंद करण्यात आला आहे. या मार्गावर गडचांदूर पोलिसांनी बंदोबस्त लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून नागरिकांनी व वाहतुकदारांनी सतर्क राहण्याचे आवाहन गडचांदुरचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी केले आहे. (Water on the Bhoigaon Wardha River Bridge) (Police Station Gadchandur)
(Wardha River) वर्धा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धानोरा पूल पाण्याखाली गेला आहे. वर्धा नदीलगत असलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा नदीवरील पुलावर जवळपास १०-१२ फूट पाणी असल्याने गडचांदूर-भोयगाव-घुग्गुस-चंद्रपूर मार्ग अवरूद्ध झाला आहे. गडचांदर भोयगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून गडचांदूर पोलिसांनी या मार्गावर बंदोबस्त लावले आहे. मार्ग अवरुद्ध झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गडचांदूर-भोयेगाव मार्गे चंद्रपूर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आज आज दुपारी जवळपास तीन वाजेपासून दालमिया सिमेंट कंपनी जवळील नारंडा ते अंतरगांव-आवरपूर रस्ताही बंद झाला असून पुलावरून पाणी वाहत असताना काही दुचाकीचालक आपले वाहन तिथून काढत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच नागरिकांनी तिथेही पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे. (gadchandur) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.