Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुर जिल्हयातील शाळा व महाविद्यालयला उद्या सुट्टी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपुर चे जिल्हाधिकारी यांचे आदेश आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २१ जुलै २०२३) -         चंद्रपूर जिल्ह्यात आज दिनांक 21/07...

चंद्रपुर चे जिल्हाधिकारी यांचे आदेश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २१ जुलै २०२३) -
        चंद्रपूर जिल्ह्यात आज दिनांक 21/07/2023 रोजी अतिवृष्टी झाली आहे तसेच भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 22/07/2023 रोजी चंद्रपूर जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली असून जिल्हयात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Order of the Collector of Chandrapur)

        जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. मात्र, इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहतील आणि सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरु राहतील. तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपतकालीन परिस्थितीत खालील दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा.
1. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र.
07172251597/ 07172272480
(chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top