Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मणिपूर अत्याचार घटनेचा राजुरा येथे तीव्र निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा निषेध मोर्चात वंचित बहुजन आघाडी, भारत राष्ट्र समिती, बिरसा क्रांती दल, अफ्रोट, मराठा सेवा संघ, गोंडवाना ...

शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा
निषेध मोर्चात वंचित बहुजन आघाडी, भारत राष्ट्र समिती, बिरसा क्रांती दल, अफ्रोट, मराठा सेवा संघ, गोंडवाना गणतंत्र पार्टी, छावा फाऊंडेशन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आदिवासी विकास परिषद चा समावेश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २२ जुलै २०२३) -
        मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात राजुरा येथील नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवित मोर्चाद्वारे तहसील कार्यालयाला धडक दिली. यावेळी जोरदार घोषणा देऊन मणिपूर येथील महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी, मणिपूर सरकार बरखास्त करा, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौकातून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर गेला तेथे तहसीलदार यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. (Hundreds of citizens took out a protest march) (Atrocities against women in Manipur state)

        या निषेध मोर्च्यात भारत राष्ट्र समिती, बिरसा क्रांती दल, वंचित बहुजन आघाडी, अफ्रोट, मराठा सेवा संघ, गोंडवाना गणतंत्र पार्टी, छावा फाऊंडेशन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आदिवासी विकास परिषद या पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. निषेध मोर्च्यात प्रामुख्याने आनंदराव अंगलवार, संतोष कुळमेथे, बिल्लू उर्फ राकेश चिलकुलवार, सनी रेड्डी, माजी ग्रापं सदस्य अजय सकीनाला, अ‍ॅड. मारोती कुरवटकर, भूषण फुसे, घनश्याम मेश्राम, मधुकर डांगे, गणपत चव्हाण, विजय मोरे, दिनेश पारखी, दीपक मडावी, दत्तात्रय मोरे, वामन साळवे, धीरज मेश्राम, बापुराव मडावी, मिलिंद गड्डमवार, मधुकर मटाले, अमोल राऊत, आसिफ सय्यद, मेश्राम, महिपाल मडावी, अमृत आत्राम, अनुसूर्या नुस्थी, सुभाष हजारे, सचिन मोरे, लक्ष्मण तुराणकर, नीळकंठ साळवे, दिलीप गिरसावळे, नितीन सिडाम, राधाताई आत्राम, रेशमाताई चव्हाण, रेखा टोकलवार, सुजाता नळे, धनश्री कुळमेथे, मंजुषा बोटरे, सुचिता तलसे, वैशाली तलसे, मीनाक्षी मून उपस्थित होते. मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला व पुरुषांचा सहभाग होता. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top