Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मणिपूर घटनेच्या विरोधात राजुरा महिला काँग्रेसचे निषेध आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 22 जुलै 2023) -         मणिपूर येथे मागच्या चार महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारा मधे...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 22 जुलै 2023) -
        मणिपूर येथे मागच्या चार महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारा मधेच 4 मे ला महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. समाज माध्यमातून आणि खाजगी वाहिन्यांवर हा व्हिडिओ प्रसारित झाला. यातून ही माहिती समोर आली की, सदर घटना 4 मे ची आहे. पीडित महिलांनी पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची तक्रार दाखल केली. तरी सुद्धा मणिपूर सरकार कडून तत्काळ कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर घटना लोकशाही देशाला शरमेने मान खाली घालणारी आहे. त्यामुळे घटनेची तात्काळ चौकशी होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी तसेच मणिपूर आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संविधान चौक राजुरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राजुरा महिला कॉग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

        या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा. समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, यु.काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, धनराज चिंचोलकर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी जि.प. सदस्य मेघा नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, रेखा आकनुरवार, प्रतिमा मडावी, अंजली गुंडावार, सुमित्रा कुचनकर, नंदा गेडाम, इंदु निकोडे, निता बानकर, कामिनी उईके, वनिता मून, कविता मोरे, किरण वाघमारे, सारिका शेंडे, पुष्पा ढोले, अश्विनी बोबडे, शोभा बोबडे, सुशीला संदुरकर, शुभांगी सिडाम, गोपीका आत्राम, मनिषा देवाळकर, भावना मडावी, सुनिता सातपुते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top