Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी रामेश्वर ढवस यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -         भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -
        भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या संमतीने चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे (Shantanu Dhote) यांनी रामेश्वर रामरतन ढवस यांची राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करून नियुक्तीपत्र प्रदान केले. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सुभाष धोटे (subhash dhote), माजी नगराध्यक्ष अरुण धोटे (arun dhote), तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, यु. काँ चे अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश माऊलीकर, यु. काँ चे तनय लांडे, यश मोरे, उद्देश लांडे, पियुष राखुंडे, प्रतिक कावळे, आकाश लांडे, नीरज मंडल यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top