Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साईनगर, रामपूर येथे साचले पाणी राजूराचा पुन्हा चंद्रपूरशी रास्ता मार्गाने  दुसऱ्यांदा  संपर्क तुटला इरई धरणाचे दोन दार उघडण्यात आले तालुक्या...

साईनगर, रामपूर येथे साचले पाणी
राजूराचा पुन्हा चंद्रपूरशी रास्ता मार्गाने दुसऱ्यांदा संपर्क तुटला
इरई धरणाचे दोन दार उघडण्यात आले
तालुक्यात एकाच रात्री ९६.०१ पावसाची नोंद
आपत्ती व्यवस्थापनाच्या फेक मेसेजमुळे शाळांना सुट्टी
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २८ जुलै २०२३) -
        राजुरा तालुक्यात आज रात्री मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात एकाच रात्री ९६.०१ पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शहरातील साईनगर व रामपूर गावातीळ सखल भागात पाणी साचल्याने सदर परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साईनगर व रामपुरातील काही भागात तर कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. (Accumulated water at Sainagar, Rampur) गुरुवारी सकाळी भोयगाव पुलावर पाणी आल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याने आणि रात्री आलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने वर्धा नदीत पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. स्थानिक प्रशासनातर्फे पुन्हा माणिकगड रेल्वेवर स्टेशनवर रेल्वे चा थांबा देण्याची विनंती करण्यात आली आहे. (Rajura again lost contact with Chandrapur by road)

पावसामुळे बंद करण्यात आलेले मार्ग
राजुरा-बल्लारशाह (बामणी मार्गे), राजुरा-गोवरी कॉलनी, टेम्भूरवाही-विरूर स्टेशन, सिंधी-धानोरा, राजुरा-सास्ती मार्ग बंद झाले आहेत. तर तालुक्यातील कोलगाव आणि मानोली (बू) या गावाचा संपर्क तुटला आहे. 

फेक मेसेजमुळे विद्यार्थ्यांना मिळाली सुट्टी
        आपत्ती व्यवस्थापनावाच्या नावाने कोणीतरी सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे खोटे आदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्याने बहुतांश ठिकाणी सुट्टीच समजण्यात आली. मात्र कुणीतरी असले कुठलेही आदेश दिले नसल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. (Schools holiday due to fake disaster management message)

इरई धरणाचे दोन दार उघडल्याने सतर्कतेचा इशारा
        आज सकाळी १० वाजता इरई धरणाचे दोन दरवाजे २५ से.मी. ने उघडले आहेत. (Two gates of Irei Dam were opened) त्यामुळे धरणाचे पाणी हडस्ती तालुका बल्लारपुर या गावापर्यंत पोहचण्याकरीता अंदाजे काही तास लागतील. सद्यस्थितीत वर्धा नदीला मोठया प्रमाणात पाणी असल्यामुळे इरई नदी काठावरील गावातील परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील वढोली, पायली भटाळी, किटाळी, अंभोरा, लखमापुर, खैरगाव, चंद्रपुर शहरातील हवेली गार्डन, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर, ओंकार नगर, महसुल नगीना बाग, बिनबा गेट, विठोबा खिडकी, पठाणपुरा, आरवट चोराळा, दाताळा, जुनी पडोली, गुरु माऊली नगर, झरपट नदी लगतच्या वस्तीतील नागरीकांना तालुका चंद्रपूर तालुका प्रशासनाद्वारे सतर्कतेच इशारा देण्यात येत आहे. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top