Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पीएम इन्फ्राव्हेंचर्स बद्दलचे आरोप बिनबुडाचे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिशाभूल करणाऱ्या माहिती प्रकाशित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल मीडिया विभागाला रीतसर तक्रार आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्...
दिशाभूल करणाऱ्या माहिती प्रकाशित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल मीडिया विभागाला रीतसर तक्रार
आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -
        प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोरपना तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या नांदा परिक्षेत्रातील यशोधन विहार (yashodhan vihar) या म्हाडाच्या अंतर्गत पीएम इन्फ्राव्हेंचरच्या निवासी प्रकल्पात 1050 घरे बांधली जात आहेत. हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा निवासी वसाहत म्हणून झळकत आहे. 
        
        सध्या या 1 BHK फ्लॅटची किंमत फक्त 8 लाख 36 हजार ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाखांच्या अनुदानाची तरतूद आहे. याशिवाय, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (BOCW) च्या पात्र लाभार्थ्यांना 2 लाख रुपये अनुदानाची तरतूद आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका, गृहनिर्माण संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका यांच्याकडून गृहकर्जासाठी कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र खऱ्या अर्थाने या योजनेचा फायदा हा तळागाळातील सर्वसामान्य लोकांना होत असतानाचे पाहत काही असंतोषी लोकांनी एखाद्याला सामोरे करून बिनबुडाचे आरोप लावत असल्याचा आरोप (PM Infraventures) पीएम इन्फ्राव्हेंचर्सच्या संचालिका पौर्णिमा श्रीवास्तव यांनी केला आहे. पौर्णिमा श्रीवास्तव (Purnima Srivastava) यांनी सांगितले कि, काही अनाधिकृत न्यूज पोर्टलवर दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. आरोप करणाऱ्यांनी त्यांची बाजूही विचारायला हवी होती मात्र कोणाच्यातरी इशाऱ्यावर एकतरफी बातमी प्रकाशित करण्यात येत आहे. या अनाधिकृत न्यूज पोर्टलची केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल मीडिया विभागाला रीतसर तक्रार करण्यात आली असून दिशाभूल करणाऱ्या खोट्या माहिती प्रकाशित केल्याबद्दल अश्या न्यूज पोर्टलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Formal complaint of unauthorized news portal to Digital Media Department, Ministry of Information and Broadcasting, Central Government) (aamcha vidarbha)

        "पीएम इन्फ्राव्हेंचर आणि म्हाडा द्वारा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा निवासी प्रकल्प असलेल्या यशोधन विहार च्या नावाची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी करण्याच्या खोट्या बातम्या पसरवून आमच्या कंपनीवर बेताल आरोप केले जात आहेत. 4 ते 5 वर्षापासून करचुकवेगिरीचे हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बोगस आहेत. आमच्या जमिनीची अकृषक ऑर्डर 15 डिसेंबर 2022 रोजी झाले आहे, तर 4 ते 5 वर्षापासून करचुकवेगिरीचे आरोप कसे शक्य आहे. ह्या पोर्टल न्यूज चॅनेल ने या विषयाबद्दल आमच्या कडुन कोणतीही माहिती, विचारपूस किंव्हा प्रतिक्रिया न घेता, आमच्या संमतीशिवाय आणि नकळत साध्या निवेदनाच्या आधारे असे खोटे दोषारोप करवून आमच्या कंपनीची प्रतिष्ठा धूमिल करून आर्थिक हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई ला आम्ही सुरुवात केली आहे.
- पौर्णिमा श्रीवास्तव
- संचालक, पीएम इन्फ्राव्हेंचर्स

        यशोधन विहार बद्दल झालेल्या तक्रारी वर चौकशी करण्यात येईल. यशोधन विहार आवास प्रकल्पाकडे करोडो रुपये कर थकीत असल्याची बातमी खोटी आहे. चौकशी करिता आम्ही माहिती गोळा करीत आहो. ही बातमी कोण आणि का प्रकशित करीत आहे ते मला विचारुन करत नाही. खोटे आरोप प्रचार करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे. यशोधन विहार च्या जागेचे अकृषक आदेश डिसेंबर 2022 ला झाल्याची माहिती मिळाली आहे. अकृषक आदेश झाल्यापासूनच कर आकारणी केल्या जाईल
- श्रीहरी केंद्रे 
- ग्राम विकास अधिकारी, नांदा

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top