Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे दिले निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प...

आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे दिले निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ठाणे (दि. ८ जुलै २०२३) -
        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. (Chief Minister Eknath Shinde's sensitivity once again) (Ambulance)

        यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. (Chief Minister Eknath Shinde)

        अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.  

          मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top