Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोहायला गेलेली तीन मुले वर्धा नदीत बुडाले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना - शोधकार्य सुरु आमचा विदर्भ - अविनाश रामटेके द्वारे गोंडपिपरी (दि. ८ जुलै २०२३) -         चार मुले ...

गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना - शोधकार्य सुरु
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके द्वारे
गोंडपिपरी (दि. ८ जुलै २०२३) -
        चार मुले वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेली असता त्यातील एक मुलगा परत आला आणि तीन मित्र वाहून गेल्याचे सांगितलं असता गावकऱ्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी किनाऱ्यावर मुलांचे कपडे दिसून आलेत. ह्यासंबंधी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे अशी बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत. सर्व मुले दहा वर्ष वयोगतील असून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. (Incident at Tohogaon in Gondpipari Taluka)

अद्याप मुलांचा शोध लागलेला नाही
        प्राप्त माहिती नुसार, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदी पात्रात पोहायला गेलीत. त्यापैकी आरुष प्रकाश चांदेकर हा घरी परत आला. त्याने तीन मित्र नदीत वाहून गेल्याचे गावात सांगितले. गावकऱ्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी पात्रजवळ मुलांचे कपडे दिसून आलेत. त्यामुळे मुले वाहून गेली असावी अशी शंका वाढली. हे सर्व विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकत असल्याचीही माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलांचा आई-वडीलानी एकच टाहो फोडला. पोलीस विभागाने घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरु केली आहे. अद्याप मुलांचा पत्ता लागलेला नाही. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे. (accident) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top