Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा फाटा येथे दूचाकी-ट्रक धड़केत युवकाचा मृत्यु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निलेश ताजनेच्या पुढाकाराने ट्रांसपोर्ट कंपनी ने मृतकाच्या कुटुंबीयास दिली 1 लाख रुपयाची आर्थिक मदत आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्र...

निलेश ताजनेच्या पुढाकाराने ट्रांसपोर्ट कंपनी ने मृतकाच्या कुटुंबीयास दिली 1 लाख रुपयाची आर्थिक मदत
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ८ जुलै २०२३) -
        औद्योगिक नगरी नांदा येथे काल रात्री अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दूचाकी धडक लागल्यामुळे झालेल्या अपघातात जयपाल कामपल्ली (२१) युवकाचा जागीच मृत्यू झाला.

        अपघाताला कारणीभुत असलेल्या ट्रक चालक व मालकाने मयत युवकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. मयताच्या कुटुंबियांनी वारंवार विनवनी स्वरूपात मागणी करूण सुध्दा त्यांनी हात झटकले. ट्रक मालकांकडून सदर बाब दाबण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु नांदा नगरातील तरुणांनी समाजसेवक निलेश ताजणे यांना सदर घटनेची माहिती दिली. निलेश ताजणे व उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले यांनी कार्यकर्त्यां समवेत लगेच घटनास्थळ गाठुन घटनेबाबत पोलिसांशी व गाडी मालकाशी चर्चा केली. ग्रिनलाईन ट्रान्सपोर्ट कंपनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे व निलेश ताजने (Nilesh Tajane) यांच्यात सकारात्मक चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या. अखेर ट्रक मालकांनी लगेचच भरपाई स्वरूपात १ लक्ष रूपये परिवारास निलेश ताजणे यांच्या माध्यमातून दिले. (On the initiative of Nilesh Tajne, the transport company gave financial assistance of Rs 1 lakh to the family of the deceased) (gadchandur)

        यावेळी उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, अभय मुनोद, नितेश बेरड, आकाश बोनगिरवार, प्रमोद वाघाडे गुरूजी, गौरव बंडिवार, रवी बंडीवार, प्रतिक सदनपवार, राजु मोहितकर, विनोद राठोड, संदिप येडे, सुरज गावंडे, नविन मल्लारपु, नागेश तुम्मेला, नरेश अण्णा, गणेश अण्णा यांचे सह नांदा बिबी येथिल बहुतांश युवा वर्ग उपस्थित होता. (accident)

गडचांदूरात अवैध पार्किंग मुळे अपघात होण्याची भीती
        सोयीस्कर वाहतुक साठी रस्ता खुला ठेवणे ही पोलिस विभागाची जिम्मेदारी आहे. मोठ्या मोठ्या ट्रांसपोर्ट कंपनीच्या रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांवर मोठी कारवाही करताना पोलिस विभाग कधीच दिसत नाही. आवारपुर आणि गडचांदूर येथील अल्ट्राटेक सीमेंट, उपरवाही येथील अंबुजा सीमेंट कंपनीतील ट्रांसपोर्ट कंपनीची वाहने नेहमी रस्त्यावर उभी दिसतात. या मुळे पूर्वी ही अनेक अपघात झाल्याने निरपराध लोकांनी जीव गमावला आहे.  गडचांदूर पोलिस ठाण्या समोरच असलेल्या मानिकगढ़ चौक ते रामकृष्ण हॉटेल पर्यंत मोठे वाहन रांगेत उभे असतात. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच बाजूच्या मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतुक सुरू असते, त्यावर ह्या अवैध पार्किंग मुळे अनेक वेळा जाम सारखी स्थिति निर्माण होते, ज्यामुळे नेहमी अपघात होण्याची शक्यता असते. या मार्गावर काही वाहन तर एक महिन्या पासून सतत रोडवर उभी असल्याची माहिती सोशल मिडीयावर ही देण्यात आली होती. या संबंधी अनेक वेळा पोलिस विभागाला निवेदन, विनंती करण्यात आली, परंतु 2-3 दिवस सख्ती  झाल्यानंतर स्थिती जस ते तस दिसते. गढ़चांदुर येथील  पिंपळगाव फाटा ते महावितरण पॉवर हाउस पर्यंत ही रस्त्यावर अनेक पंक्चर दुकान ठाटल्याने रस्त्यावर अनेक मोठी वाहने उभी असतात. जवळच दारू दुकान असल्याने तळीरामांची मोठी ये-जा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. यातायात पोलिस विभागाने याकळे जातिने लक्ष देण्याची गरज आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top