आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १० ऑगस्ट २०२६) -
जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राजुरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वीर बाबूराव शेडमाके, राणी दुर्गावती आणि शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या संघर्ष, शौर्य आणि योगदानाचे स्मरण
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विचार व्यक्त केले. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, हक्क, सामाजिक योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीरांचे योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. वीर बाबूराव शेडमाके, राणी दुर्गावती आणि शहीद बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सृजन नागरिक मंच, राजुरा आणि आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. वसतिगृहाच्या गृहपाल मंजुषा देऊळकर, विद्यार्थीनी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये पेरू, आंबा, फणस, चिकू, करवंद, हेटी आदी फळझाडांचा समावेश होता. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच विद्यार्थिनींमध्ये झाडांच्या संगोपनाची जबाबदारी आणि पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वृक्षारोपण केल्यानंतर प्रत्येक ग्रुपकडे एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली. झाडांना नियमित पाणी देणे, त्यांची निगा राखणे आणि वाढीसाठी आवश्यक काळजी घेणे याबाबत विद्यार्थिनींना जबाबदारी देण्यात आली. या उपक्रमामुळे केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला. विद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सृजन नागरिक मंचाचा सक्रिय सहभाग
या कार्यक्रमात सृजन नागरिक मंच, राजुराचे संयोजक मिलिंद गड्डमवार, अॅड. मेघा धोटे, विकास कल्लुरवार, कैलास कार्लेकर, मनोज केळकर, सरीता गेडाम, सतिश बावणे आणि बंडू संदूलकर यांची उपस्थिती होती. वसतिगृहातील विद्यार्थीनी प्रतिनिधी साक्षी मडावी, अस्मिता मडावी, साक्षी मत्ते, उज्ज्वला पंधरे, प्रेमीला मडावी, कृतिका उईके, दिव्या मरापे आणि रानी कोटुले यांच्यासह इतर विद्यार्थीनींनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या वसतिगृहाच्या गृहपाल मंजुषा देऊळकर, कर्मचारी, विद्यार्थीनी तसेच उपस्थित सर्वांचे सृजन नागरिक मंचाचे संयोजक मिलिंद गड्डमवार यांनी आभार मानले.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण, स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीरांना अभिवादन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम राजुरा येथे उत्साहात पार पडला.
#WorldTribalDay #WorldTribalDay2026 #AdivasiDay #AdivasiSamaj #AdivasiStudents #AugustKrantiDin #QuitIndiaMovement #Rajura #RajuraNews #ChandrapurNews #Chandrapur #VidarbhaNews #MaharashtraNews #TribalWelfare #TribalStudents #GovernmentHostel #TreePlantation #TreePlantationDrive #EnvironmentConservation #BirsaMunda #RaniDurgavati #BaburaoShedmake #SrujanNagrikManch #RajuraNewsToday #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.