तज्ज्ञ दंतचिकित्सकांच्या उपस्थितीत आश्रम शाळेत यशस्वी आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 07 ऑगस्ट 2026) -
रोटरी क्लब राजुरा (RID-3030) यांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी श्रीमती गोपीबाई सांगडा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, चुनाळा रोड, राजुरा येथे विशेष मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात दंतचिकित्सक डॉ. अमिषा गणेश पेटकर (B.D.S., FCO) आणि दंतचिकित्सक डॉ. ज्योती सारडा (बजाज) (B.D.S., MRD, FCO) यांनी विद्यार्थ्यांच्या दात व मुखाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दात किंवा मुखाचे विविध आजार आढळलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्राथमिक उपचार करून संबंधित विद्यार्थ्यांवर मोफत औषधोपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. दंतआरोग्याबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना योग्य दंतस्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांना दातांची नियमित स्वच्छता, योग्य आहार आणि वेळेवर दंत तपासणीचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे आणि कोषाध्यक्ष आनंद मोहरील यांनी या सेवाभावी उपक्रमाची माहिती देताना भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच परिसरातील इतर शाळांतील विद्यार्थ्यांनीही अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. "निरोगी दात – सुंदर हास्य – निरोगी जीवन" हा संदेश देत रोटरी क्लब राजुरा समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्राचार्य तथा मुख्याध्यापिका छाया शामजी मोहितकर यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरावेळी अध्यक्ष राजू गोखरे, माजी अध्यक्ष निखिल चांडक, माजी अध्यक्ष कमल बजाज, क्लब सदस्य डॉ. गणेश पेटकर, सदस्य ऋषभ गोठी, कल्याण नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक मनीष पिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिर सुरळीत पार पडले.
#Rajura #RotaryClubRajura #DentalCamp #FreeDentalCamp #OralHealth #DentalCheckup #TribalStudents #HealthCamp #Chandrapur #Vidarbha #Maharashtra #CommunityService #RotaryRID3030 #StudentHealth #SocialService #PublicHealth #DentalAwareness #RajuraNews #ChandrapurNews #VidarbhaNews

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.