Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामीण भागातील विकासानिधी करिता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार - अँड.संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड संजय धोटे यांचे हस्ते साखरवाही येथे विकास कामाचे भूमिपूजन व वर्ग खोलीचे लोकार्पण संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुर...

माजी आमदार अँड संजय धोटे यांचे हस्ते साखरवाही येथे विकास कामाचे भूमिपूजन व वर्ग खोलीचे लोकार्पण संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ९ जुलै २०२३) -
        केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा राज्यात शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत आहे, सरकारच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी योजनेच्या माध्यमातून सर्व समाजच्या घटकाचा नागरिकांना लाभ मिळत आहे त्यांचं अनुषंगाने राजुरा तालुक्यातील साखरवाही येथे शासनाच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याच्या बांधकाम करण्याकरिता जनसुविधा निधी अंतर्गत 10 लक्ष रुपयांचे रस्त्याचे बांधकाम,साखरवाही येथे समशान भूमीचे बांधकाम व जिल्हा परिषद शाळेचे वर्ग खोलीचे लोकार्पण माजी आमदार अँड संजय धोटे यांचे हस्ते संपन्न झाले. (Ex-MLA and Sanjay Dhote completed Bhoomipujan of development work and inauguration of class room at Sakharwahi)

       कार्यक्रमा प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, ग्रामपंचायत साखरवाहीच्या वतीने माजी आमदार अँड संजय धोटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी व ईतर विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करणार असून त्या करिता पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. (Rajura) (Adv Sanjay Dhote)

        यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांचे सह गावच्या सरपंच सौ वर्षा दौलत बोरकुटे, उपसरपंच भास्कर वनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा नळे, अम्रपाली वानखेडे, बाळू टेकाम, शाळेचे मुख्याध्यापक रवि सोयाम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सपना मडावी, भाजपाचे युवा नेते संदीप गायकवाड, भाजपाचे दौलत बोरकुटे, भोपळे साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष गजानन विधाते, जनार्धन बोरकुटे, पुंजाराम बरडे, बाबुराव वाघमारे, ईश्वर वानखेडे, विठोबा वानखेडे, तातोराव आगलावे, यादवराव रासेकर, दिनकर रासेकर, राजेंद्र लोहे, संतोष रासेकर, अरुण पाहनपटे यांचेसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top