Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक कंपनीने उपोषणाचा दुसऱ्याच दिवशी उपोषणकर्त्यांचा सर्व मागण्या केल्या मान्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निंबू पाणी पाजून सतीश मिश्ना ने आमरण उपोषण संपवले  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ४ जून २०२३) -         रमाब...
निंबू पाणी पाजून सतीश मिश्ना ने आमरण उपोषण संपवले 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ४ जून २०२३) -
        रमाबाई आंबेडकर महिला मंडळ, आवारपुर आणि ग्रामपंचायत आवारपूरच्या माजी सदस्या शिला धोटे यांच्या नेतृत्वाखाली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत होणाऱ्या लोडर भरतीत तात्काळ मयत, लकवाग्रस्त, सेवानिवृत्त तसेच अतिशय गरिबांच्या मुलांना या भरतीत समाविष्ट करण्याची मागणी करत सुरू केलेले  अल्ट्राटेक कंपनी विरुद्ध उपोषणाला घाबरून कंपनीने दुसऱ्याच दिवशी सर्व मागण्या मान्य करत उपोषण समाप्त करण्यात आले. 

        अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपुर येथे सुरू असलेल्या लोडरच्या भरतीत शिला धोटे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप कंपनी प्रशासनावर लावला होता. आवारपूर सह दत्तक गावातील कोरोना आजाराने, लकवाग्रस्त आणि गंभीर आजारी असलेल्या कामगारांच्या मुलांना प्राधान्य देत सेवानिवृत्त, अत्यंत गरीब असलेल्या मुलांना  या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या  भरतीत घेण्यात यावे ही मागणी धरून अनेक वेळा कंपनी प्रशासनाला निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण नाही झाल्यास चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. आपल्या मागण्या पूर्ण करण्या करिता अल्ट्राटेक सोबत चर्चा करण्यात आली होती. परंतु कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत आवारपूरच्या माजी सदस्या शिला धोटे यांनी रमाबाई आंबेडकर महिला मंडळ, आवारपुरच्या महिलांना सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला माल्यार्पण करून दिनांक १ जून २०२३ ला अल्ट्राटेक प्रशासन विरुद्ध उपोषणाला सुरुवात केली होती. (Ultratech Cement Company) (Gadchandur)

        या उपोषणाला स्थानीय बेरोजगार तरुण आणि नागरिकांचे अपार जनसमर्थन मिळत असल्याने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी संघर्ष आमरण उपोषणाला भेट देऊन सर्व मागण्या मान्य केले आणि उपोषण सोडण्याच्या आग्रह केला. अल्ट्राटेक प्रशासन तर्फे सतीश मिश्ना ने निंबू पाणी पाजून आमरण उपोषण समाप्त झाल्याची घोषणा केली.

        अल्ट्राटेक कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे गडचांदूर, रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, अशोककुमार उमरे, प्रशासकीय अधिकारी किशोर उइके, मंडळ अधिकारी, विकास चन्ने तलाटी, गौतम धोटे, लटारी ताजने, सुधाकर कुसराम, सचिन बोंडे, प्रमोद कोडापे, कल्पतरू कन्नाके, सुरेश दिवे, कैलास ताकसांडे, विकास दिवे, रमेश खाडे, दर्शन बदरे आदिच्या उपस्थित आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. 

गावातील बेरोजगार युव कांच्या हितासाठी झालेल्या या आमरण उपोषणाला गावातील सरपंच आणि उपसरपंच यांनी कंपनीच्या लोडरच्या भरती व आमरण उपोषणाला साधी भेटही नाही दिल्याने गावात तर्कवितर्क ला उधाण आल्याचे परिसरात चर्चा दिसून येत आहे. (aamcha vidarbha)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top