Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विना परवानगी सावली देणाऱ्या झाडाची रात्रीच्या अंधारात कत्तल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लेआउट धारकांचा प्रताप प्रशासनिक अधिकारी ने दिले कारवाईचे आश्वासन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ४ जून २०२३) ...
लेआउट धारकांचा प्रताप
प्रशासनिक अधिकारी ने दिले कारवाईचे आश्वासन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ४ जून २०२३) -
        अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लगत असलेल्या शेत सर्वे क्रमांक १९/३ या शेतजमिनीवर लेआउट करिता रस्ता तयार करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर असलेले नांदाफाटा चौकातील १० वर्षांपूर्वी लावलेले कडुलिंबाचे मोठया झाडाची १ मे च्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत लेआउट धारकांनी कटर मशीनच्या साहायाने कत्तल केली आहे उन्हाळ्यात सुखद सावली देणारे झाड रातून कापून टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व नाराजी दिसत असून चर्चेचा विषय बनला आहेत यामुळे अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यांची टोळी गावात तयार झाली का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत असून  या सर्व गंभीर प्रकाराची सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून प्रशासनिक अधिकारी कुठली कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत

सविस्तर वृत्त असे की मौजा नांदा शेतशिवारातील सर्वे क्रमांक 19 /3 ही शेतजमीन शासनाकडून वाटपात ( सिलिंग ) मिळालेली होती 2019 मध्ये वसीम बेग यांनी शेत विकत घेतले या शेतजमिनीवर लेआऊट टाकल्याचे दिसते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत नांदाफाटा चौकात कडू लिंबाचे मोठे झाड लेआउट धारकाने ना परवानगी, कसलीही विचारणा न करता सावली देणाऱ्या वृक्षाची २ मे ला रात्रीच्या अंधारात कत्तल केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व संताप व्यक्त केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाकडे  या संपूर्ण प्रकाराची व्हाट्सअप व फोन करून माहिती देण्यात आली असून प्रशासनिक अधिकाऱ्यांनी लेआऊट धारकावर कठोर कारवाई करून त्याचे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. १० वर्ष जुने सावली देणार कडुलिंबाचा झाड अचानक रातून कापल्याने स्थानिय वृक्ष प्रेमींना आतोनात दुःख होत आहे. लेआऊटच्या रस्त्या करिता जागा असतानाही जाणीवपूर्वक विनापरवानगी झाड तोडणे योग्य नाही. याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. (aamcha vidarbha) (gadchandur)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील कडुलिंबाचे मोठे झाड आम्हा सर्व मित्र मंडळीचे बसण्याचे ठिकाण होते कुठलेही शासन परवानगी  न घेता झाड कटर ने कापणं योग्य नाही सरपंच कडे तक्रार केली आहे. 
सुमेंद्र ठाकूर, नांदाफाटा
*****************************
सदर शेत जमीन बल्लारपूर येथील पार्टी सोबत विक्रीचा करार झाला आहे कोणी झाड तोडले मला माहित नाही.  
वसीम बेग, शेत मालक
*****************************
सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूरच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी व विचारणा करूनच झाड आम्ही तोडले आहेत
अयुब खान, बल्लारशाह
*****************************

झाडाच्या कापण्यासंदर्भात वनविभागाकडे साधे एक पत्र सुद्धा आलेले नाही त्यामुळे परवानगी देण्याचा विषयच नाही ज्यांनी कोणी हे संतापजनक कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल 
अरुणा चौधरी
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनसडी
*****************************

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कापण्यासंदर्भात आमच्याकडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही अयुब खान परवानगी असल्याचे खोटे सांगत आहे तहसीलदार यांना कारवाई करण्याबाबत पत्र देणार आहे 
आकाश बाझारे
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top