संतप्त नागरिकांनी केले धोपटाळा येथे रास्ता रोको आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ जून २०२३) -
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा ओपनकास्ट कोळसा खाणीत 2 जून ला सायंकाळी 5 वाजता झालेल्या ब्लास्टींगचा जबर धक्का सास्ती या गावाला बसला. या ब्लास्टींगच्या धक्क्याने गावातील संपत चिपाकुर्ती यांच्या घराच्या बेडरूमचा स्लॅब कोसळला. विशेष म्हणजे हे घर पक्के आणि सिमेंट बांधकाम असलेले आहे. मात्र घरमालक आणि त्याचा परिवार बाहेरगावी गेल्याने घरात कुणीच नव्हते. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी संतप्त नागरिकांनी धोपटाळा येथे रास्ता रोको आंदोलन करून माती उत्खनन करणारी चड्डा कंपनीची वाहतूक रोखली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत अनेक घरांना भेगा गेल्या. संपत चिपाकुर्ती यांच्या घराच्या बेडरूम मधील बेड वर स्लॅब पडल्याने बेड सह घरातील अनेक वस्तू चकनाचूर झाल्या. (aamcha vidarbha) राजुरा तालुक्यातील अनेक कोळसा खाणीत गावालगत शक्तिशाली ब्लास्टींग होत असल्याने गावातील लोकांना सायंकाळी ब्लास्टींगच्या वेळी जीव मुठीत धरून बसावे लागते. यावेळी आरोग्यावर परिणाम होणारे वायू आणि उडणारी धूळ यामुळे येथील ग्रामीण नागरिक त्रासून गेले आहेत. ब्लास्टींग करताना वेकोलिने नागरिकांना विश्वासात घेऊन, कमी क्षमतेची ब्लास्टींग करून सुरक्षा व सतर्कता बाळगावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (A major disaster was averted as the home owner went to the village) (Angry citizens staged a road stop movement at Dhoptala) (WCL Ballarpur Area) (Coal India) (Chaddha Transport)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.