Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उंटाला घाबरून बैलांचे पाय तुटले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऐन हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. ४ जून २०२३) -         शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी सायंकाळच्या सुम...

ऐन हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. ४ जून २०२३) -
        शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा सिंधी येथील संजय वामनराव ढुमणे यांच्या शेतामध्ये त्यांचा सालगळी शेती हंगामा करिता वखरणी करीत असताना शेड्या मेंढ्या सोबत उंट घेऊन आपल्या भागात चाऱ्यासाठी आलेल्या पैकी एका व्यक्तीने उंटाला चारायला वखरणी चालू असलेल्या शेतात घेऊन आला. तेव्हाच वखरणी करणाऱ्यांने त्याला दोन तीन वेळा सांगितले की वखरणी चालू आहे. तुझ्या उंटाला बैल जर घाबरले तर नुकसान होईल तु उंटाला घेऊन दुसरीकडे जा तरी त्याने मुजोरीने तिथेच उंटाला चारत होता. तेवढ्यात वखरणी चे बैल घाबरून सैरावैरा आऊताला घेऊन पळू लागले आणि त्या पैकी एका बैलांचा पाय तुटून दुखापत झाली. उंट वाल्यांच्या मुजोरी मुळेच ऐन हंगामाच्या वेळी ७००००/- रुपये किमतीच्या बैलाचे नुकसान झाले असल्याने संबंधित उंट मालकाने नुकसान झालेल्या बैल मालकाला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतीचे हंगाम सुरू होत असल्याने मेंढपाळ्यांना शेत शिवारात उंट, मेंढ्या चराईस मनाई करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि परिसरातील शेतकरी यांच्या कडून प्रशासनाला करण्यात आली आहे. (Losses to farmers during the rainy season) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top