Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: योग अंगीकृत करणे म्हणजे असाधारण शक्ती धारण करणे - हरीश शर्मा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा बल्लारपूर द्वारे योग शिबीर व योग नृत्य संपन्न आमचा विदर्भ - घनश्याम बुरडकर द्वारे  बल्लारपूर (दि. २१ जुन २०२३) -         २१ जुन आंतररा...
भाजपा बल्लारपूर द्वारे योग शिबीर व योग नृत्य संपन्न
आमचा विदर्भ - घनश्याम बुरडकर द्वारे 
बल्लारपूर (दि. २१ जुन २०२३) -
        २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त भारतीय जनता पक्ष बल्लारपूर च्या वतीने भव्य योग शिबीर व योग नृत्य कार्यक्रम स्थानिक एकदंत लॉन डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड येथे आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करत भारत माता की जय, वंदे मातरम् रोज करो योग करो या उद्घोषनेने योग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. 

        यावेळी भाजपचे जेष्ठ नेते व वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष (chandansingh chandel) चंदन सिंह चंदेल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना योग हि प्राचीन भारताची पारंपरिक कला असुन बाबा रामदेव यांनी या कलेला जनकल्याण करिता ईश्वरीय प्रसाद म्हणुन याचा प्रचार व प्रसार आपल्या देशात केला. या योग कलेची जाणीव ठेऊन विश्वगौरव पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी विश्व पटलावर एक दिशा देऊन संपूर्ण जगात वसुधैव कुटुम्बकम या भावनेतुन २१ जुन ही तारीख विश्व संघा कडून आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करून हिमालय ऊंची गाठली. योग हा आपल्या जीवनाचा नित्यक्रम असला पाहिजे व सर्वांनी याला आत्मसात करून आपलं जीवन निरोगी करावे असे आवाहन चंदेल यांनी केले. 

        बल्लारपूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष (harish sharma) हरीश शर्मा यांनी याप्रसंगी योग हा आजच्या मानवीय जिवनात अविभाज्य घटक असलाच पाहिजे असे मत व्यक्त केले. योग शारीरिक, मानसिक रित्या सशक्त करतो व यामुळे आपल्या शरीरात असाधारण ऊर्जेचा संचार असतो ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. प्रत्येकाने योग करून आपल्या जीवनात एक नवीन चैतन्य निर्माण करावे असे प्रतिपादन यावेळी हरीश शर्मा यांनी केले. या प्रसंगी मंचावर भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, गोपाल रेड्डी, सौ वैशाली जोशी, श्रीमती गंगाताई मल्लोजवार, सौ वंदना गोगुलवार, सौ विना झाडे, श्रीमती विजेता आर्य, शैलेश लोढीया, निलेश खरवडे, मनीष पांडे, धनंजय सिंग, घनश्याम बुरडकर उपस्थित होते. (Yoga Camp and Yoga Dance conducted by BJP Ballarpur)

        कार्यक्रमात भाजपा नेते, शक्तिकेंद्र, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता, भाजयुमो, पतंजली योग परिवार, सखी मंच, रोटरी क्लब, जेसीआय, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तरुण उत्साही क्रीडा मंडळ व अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून यशस्वी केला. कार्यक्रम आयोजन समितीचे संयोजक इंजी. देवेंद्र वाटकर, सहसंयोजक बिरेंद्र श्रीवास, ऋषिपाल गेहलोत, प्रमोद रामिल्लावार, मिथलेश खेंगर, अजहर शेख परिश्रम घेतले. संचालन किशोर मोहुर्ले तर आभार सतीश कनकम यांनी केले. (aamcha vidarbha) (ballarpur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top