राजुरा (दि. २१ जुन २०२३) -
इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इन्फट कॉन्व्हेंट, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय आणि पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध योगासन व ध्यान आसनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यात उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. (Infant Jesus English Public High School Rajura)
कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्फंट जीजस सोसायटीचे सचिव, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, गटविकास अधिकारी हेमन्त भिंगारदिवे, आर.एफ.ओ. सुरेश एलकेवाड्, राऊंड ऑफिसर निबुद्धे, पतंजली योग समिती राजुराचे संयोजक प्रा. दत्तात्रय मोरे, मुखरु सेलोटे, पुंडलिक उराडे, हरिभाऊ डोर्लीकर, ओमप्रकाश गंगशेट्टीवार, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल शेंडे, इन्फन्ट च्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह पतंजली योग समितीचे सदस्य, इन्फन्ट् संस्थेअंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.