Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे  राजुरा (दि. २१ जुन २०२३) -         राष्ट्रीय सेवा योजना पथक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग श्री शिवाजी कला...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे 
राजुरा (दि. २१ जुन २०२३) -
        राष्ट्रीय सेवा योजना पथक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर तथा पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार २१ जून २०२३ ला सकाळी ५.३० ते ७.३० या दरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

        संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योग दिन साजरा करणे सुरू झाला. यावर्षी भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळाले असून "वसुधैव कुटुंबकम्" या संकल्पनेवर ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण भारत भर परिषदा चालू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या योग दिवसाची संकल्पना भारत सरकारने "वसुधैव कुटुंबकम्" ठेवलेली आहे.

         पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. कोरोना महामारीमधे सुदृढ शरीराचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहेच त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे एक दिवसापूरते प्रतिकात्मक न राहता प्रत्येक गावखेड्यामध्ये योगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरूपी होणे आवश्यक आहे योगाचे महत्व आणि योगदान पटवून देण्यासाठी योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे, तसेच सुदृढ पिढी निर्माण करणे हे योग दिनाचे उद्दिष्टे ठेवून नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी योग प्रशिक्षक म्हणून हरिभाऊ डोर्लीकर, पी.एस. उराडे तसेच पतंजली योग समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून उपस्थिताना योगाचे धडे व योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी दोन तास योगाची प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली.

        या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. संजय धोटे (Adv. Sanjay Dhote), सुदर्शन निमकर, माजी जिप सदस्य तसेच आ.शि.प्र.म. राजुरा चे सचिव (Avinash Jadhav) अविनाश जाधव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून साजिदहुसेन बियाबानी, अँड. अरुण धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर.आर. खेराणी, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संचालक डॉ. आनंद रायपुरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की तसेच राजुरा शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील संपूर्ण कर्मचारी, रासेयो चे स्वयंसेवक या प्रसंगी उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. संचालन व आभार प्रा. डॉ आर.आर. खेराणी यांनी मानले.
(rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top