राजुरा (दि. २१ जुन २०२३) -
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, आदर्श हायस्कुल, राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट -गाईड युनिट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श शाळेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जे.डी. नंदरधने, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अध्यक्ष बादल बेले, अल्का गंगशेट्टीवार, अंजली गुंडावार, विना देशकर तसेच पतंजली योग समितीचे सदस्य तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समितीच्या संघटिका, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी योग्य दिनाचे औचित्य साधून योग प्राणायाम केले. (Aadarsha High School)
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस (International Yoga Day) आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योग दिन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीमधे सुदृढ शरीराचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले, त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे प्रतिकात्मक न राहता प्रत्येक गावखेड्यामध्ये, शाळांमध्येयोगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरूपी होणे आवश्यक आहे योगाचे महत्व आणि योगदान पटवून देण्यासाठी योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा द्यावी असे प्रतिपादन जे.डी. नंदरधने यांनी केले. तसेच सुदृढ पिढी निर्माण करणे हे योग दिनाचे उद्दिष्टे ठेवून नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले याचा विध्यार्थी, शिक्षक यांना नक्कीच उपयोग होईल असे मत मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी व्यक्त केले. उपस्थिताना योगाचे धडे व योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी दीड ते दोन तास योगाची प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, रुपेश चिडे, राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट-गाईड युनिटचे विद्यार्थी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सदस्य उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार रुपेश चिडे यांनी मानले. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.