युवासेने द्वारे आगार प्रमुखांना निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २० जुन २०२३) -
दि. 28 नोव्हेंबर 2022 ला वन विभागाच्या निवासी वसाहत मधील झाड बस स्थानकावर छत कोसळले होते. त्या घटनेमध्ये मनोज पाझारे नावाच्या विद्यार्थी जखमी झाला होता. आता काही दिवसातच 26 जून पासून शाळा चालू होणार आहे व पावसाळा सुद्धा लागणार आहे अशा वेळी विद्यार्थ्यांना व ये-जा करणाऱ्या प्रवासांना बस स्थानकाच्या छताच्या खाली उभे राहणे धोकादायक ठरत आहे. बस स्थानकावरून प्रवास करणार्या विद्यार्थी व प्रवासी आपले जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून प्रवाशांचे पैसे व दाग दागिने चोरीच्या तक्रारी वाढली आहे व काही महिन्यांपूर्वी बस स्थानकाच्या आवारात एका युवकाची हत्या झाली होती अशा प्रसंगी बस स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईट ची गरज भासत आहे. बस स्टॅन्ड परिसरातील उपरोक्त बाबींच्या मागणीचे निवेदन (yuvasena) युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुणाल कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना शहर प्रमुख स्वप्निल मोहुर्ले, युवा सेना तालुका प्रमुख (bunty malekar) बंटी मालेकर, युवा सेना उपशहर प्रमुख श्रीनाथ बोलुवर, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रविण पेटकर यांनी दिले. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.