आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. २२ जून २०२३) -
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकातून राजुरा येथील एका महिलेच्या बॅग मधून चोरांनी सुमारे दोन लाखाचे सोने आणि आठ हजारांची नगदी रक्कम उडविली. गर्दीचा फायदा घेत चोराने ही संधी साधत हात साफ केला. या प्रकरणी पीडित महिलेने राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. (Eight thousand also flew from the bag)
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कर्मचारी कांता अनिल मालेकर या प्रकृती चांगली नसल्याने चंद्रपूर येथे दवाखान्यात जात होत्या. येथे घरी चोरीची भीती असल्याने सोने चंद्रपूर येथील विवाहित मुलीकडे सुरक्षित ठेवावे, म्हणून बॅगमध्ये सोने व आठ हजारांची रक्कम घेऊन त्या
चंद्रपूरला निघाल्या. राजुरा बस स्थानकावर येताच. बस मध्ये चढण्याकरिता मोठी गर्दी झाली. चंद्रपूरला पोहचताच बॅगमधील सोने व रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजुरा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. (Police Station Rajura)
दिनांक 16 जून रोजी सकाळी दहा वाजता पोलिस ठाण्यात गेलेल्या या महिलेला ताटकळत ठेवण्यात आले. शेवटी या महिलेच्या जावयाने चंद्रपूर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी तब्बल 11 तासानंतर रात्री नऊ वाजता तक्रार दाखल करून घेतली. तक्रारी नुसार या महिलेचा दीड तोळ्याचा गोफ, सव्वा तोळ्याची पोत असे एकूण पाऊणे तीन तोळे सोने आणि आठ हजार रुपयांची नगदी रक्कम चोरीला गेली. यासंदर्भात राजुरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या राजुरा शहरात आणि विशेषता शनिवारी या बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. अनेक दुचाकी वाहनेही चोरीला गेली आहेत. मात्र, अद्याप राजुरा पोलिस या चोरांचा तपास लावण्यात अयशस्वी ठरले आहे. (aamcha vidarbha) (rajura)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.