Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा "त्या" पुलाचे काम पाच महिन्यापासून बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"त्या" पुलाचे दुरूस्तीचे काम कासव गतीने  दोन विभागातील आपसी भांडणामुळे कामाला विलंब आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) अरोरा (प्रतिनिधी)...
"त्या" पुलाचे दुरूस्तीचे काम कासव गतीने 
दोन विभागातील आपसी भांडणामुळे कामाला विलंब
आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) अरोरा (प्रतिनिधी)
बल्लारशाह (दि. १२ जुन २०२३) - 
        दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा एकमेव फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) पाच महिने उलटूनही नागपूर रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप सुरू झालेला नाही. गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी हा पूल कोसळल्याने एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर 16 जण जखमी झाले होते. दुरुस्तीनंतर हा पूल काही दिवसांनी ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या नागपूरच्या एंड ला नवीन एफओबी तयार होताच, कोणतेही पूर्व नियोजन न करता 11 जानेवारी 2023 रोजी दुरुस्तीच्या नावाखाली ते पुन्हा बंद करण्यात आले. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. जे अजूनही सुरूच आहे. दरम्यान, अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार परिषद, NRUCC, नवी दिल्ली यांनी वेळोवेळी रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई, मध्य रेलवे नागपुर चे DRM यांच्या सोबत बैठका आणि पत्रव्यवहार केला. सर्व अधिकाऱ्यांकडून 15 दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन मिळत राहिले. परंतु मध्य रेल्वे नागपूर चे इंजीनियरिंग व ऑपरेटिंग विभागाच्या आपसी वादामुळे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, 6 जून रोजी मध्य रेल्वे नागपूरचे डीआरएम यांनी 15 दिवसांत सुरू होईल असे दूरध्वनीवरून सांगितले. मात्र 9 जून रोजी थेट पुलाची पाहणी केल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो सुरू होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोणाचा शब्द विश्वासार्ह आहे? आता यावरच प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. (Ballarshah Railway Station) (Indian Railway) (Ajay Dubey Member, National Railway Consumer Advisory Council)

        बल्लारशाह रेल्वे स्थानकाबाबत नागपूर रेल्वे विभाग नेहमीच उदासीन राहिला आहे. तत्कालीन डीआरएमचा अननुभवीपणा आणि अधिकाऱ्यांवरील कमकुवत पकड या मुळे गेल्या तीन वर्षांत नागपूर रेल विभाग विकास, प्रवासी सुविधांमध्ये पिछाडीवर राहिला. आता नवीन DRM कडून खूप अपेक्षा आहेत, पण तरीही ते अद्याप अपेक्षेप्रमाणे वेग पकडू शकलेले नाहीत. (aamcha vidarbha)

        प्रत्यक्षात नागपूर विभागाचे ऑपरेटिंग विभाग प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरून प्रवासी आणि मालगाड्या काही तासांसाठी अन्य प्लॅटफॉर्म वर वळवतो आणि इंजीनियरिंग विभागाला ब्लॉक देतो, त्यानंतरच काम होते, मात्र दोन ते तीन तासांचा ब्लॉक अपूरा असतो. म्हणून दुरुस्ती कार्य ची गती खूप मंद आहे. अधिक तास ब्लॉक मागवून ही मिळत नसल्याने गोगलगायीच्या गतीने काम सुरू झाले आहे. 10 जानेवारी रोजी पूल बंद होताच दुरुस्तीचे काम सुरू केले असते तर दोन माह पूर्वीच काम पूर्ण झाले असते. 

        मात्र पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सीनी. डी ई एन नागपूर यांनी कोणतीही पूर्व तयारी न करता पूल बंद केला. आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या नागपूर एंड वरील नवीन पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. आजारी, महिला, लहान मुले, वृद्धांची अवस्था बिकट होते. जड सामान घेऊन प्रवासी शिव्या देत दुसऱ्या फलाटावर जातो. मात्र रेल्वे प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नाही.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top