Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ध्येय गाठण्यासाठी अभ्यासिकेचा उत्तम पर्याय - रजनी शर्मा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साई अभ्यासिके तर्फे अभिनंदन व सत्कार सोहळा संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे  राजुरा (दि. १२ जुन २०२३) -          येथील साई अभ्यासिकेमध...
साई अभ्यासिके तर्फे अभिनंदन व सत्कार सोहळा संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे 
राजुरा (दि. १२ जुन २०२३) - 
        येथील साई अभ्यासिकेमधे नियमित सभासद असलेल्या डाॅ. लीना मारोती धांडे यांची एमबीबीएस पदवी पूर्ण झाल्यावर वैद्यकीय अधिकारी (M.O.) म्हणून बल्लारपूर रुग्णालयात नियुक्ती झाल्याप्रसंगी त्यांचे विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या निकालात कु. वेदान्ती गर्गेलवार  कु. अनुष्का कुडे, कु. गझल शेख या तीघांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले. त्यासोबतच सुजा खोब्रागडे या कॉम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑफिसर परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून आठव्या क्रमांकाचे यश प्राप्त केल्याबद्दल या सर्व  विद्यार्थ्यांना भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. (Congratulation and felicitation ceremony by Sai Abdhyasika)

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अध्यक्ष बादल बेले, प्रमुख अतिथी म्हणून नेफडो च्या राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सौ. रजनी शर्मा, सत्कारमूर्ती तथा प्रमुख अतिथी बल्लारपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना धांडे, साई अभ्यासिका मार्गदर्शिका श्रीमती सुलोचना रोहणे यांची उपस्थिती होती. ()

        याच वेळेस पाहुण्यांनी अभ्यासिकेच्या विकासासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देत अभ्यासाला अनुरूप व शिस्तबद्ध आणि शांत वातावरण विद्यार्थ्यांचा अभ्यासात नियमितपणा आणण्यासाठी पुरक ठरत आहे तसेच ध्येय गाठण्यासाठी अभ्यासिका उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन रजनी शर्मा यांनी व्यक्त केले. (rajura) (aamcha vidarbha)

        अध्यक्षीय मनोगतातून बादल बेले यांनी अभ्यासिका अल्पवधितच आदर्श व आकर्षक केंद्र बनेल असे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर, उमेश लढी यांनी तर आभार राहुल शेंडे यांनी मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top