Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी कोरपना (दि. १२ जून २०२३) -         कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी
कोरपना (दि. १२ जून २०२३) -
        कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत आमदार स्थानिक विकास निधीतून स्थानिक भोईसमाजासाठी शासकिय खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रूपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. (Korpana) (Subhash Dhote)

        या प्रसंगी वाल्मीकी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी आ. धोटे यांनी सांगितले की लखमापूर गावाच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू. वाल्मीकी मस्यपालान सहकारी संस्था भोई समाज बांधव यांनी पारंपरिक व्यवसाय सोबत जोड धंदा करण्यावर भर दिला पाहिजे आणि वाल्मिकी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे असे सांगितले. 

        या प्रसंगी सरपंच अरुण जुमनाके, उपसरपंच संभाजी टेकाम, माजी तालुकध्यक्ष तथा जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, भोई समाज अध्यक्ष सुरेश केसुरकर, अध्यक्ष तंटा मुक्त स. अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळकर, सचिव श्रावण गेडाम, युवक तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, देवराव थीपे, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद सिडाम, नितीन जूनघरे, शुभम थिपे, देविदास भोयर, संभाजी खामनकर,कवडू जुनघरे, वाघुजी भोयर, चंद्रभान जूनघरे, अर्जुन भोयर, गिरजाबाई मडावी, संदिप बावणे, अरुण उरकुडे, शुभम उरकुडे, हरिदास पारखी, सुरेश कावडे, नागरीक उपस्थित होते. संचालन सुधीर थिपे यांनी, प्रस्ताविक देविदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदिप बावणे यांनी मानले. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top