आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 14 जून 2023) -
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यचे विदर्भस्तरीय पक्ष प्रचार व प्रसार कार्याचे आढावा व आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात रणनीती आखण्याचा दृष्टिकोनातून भारत राष्ट्र समितीचे विदर्भस्तरीय अधिवेशन नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात 15 जुन 2023 ला भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच तेलंगणातील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao), विदर्भ प्रभारी आमदार बालका सुमन, नागपूर विभाग समन्वयक ज्ञानेशजी वाकुडकर व अन्य लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. होणाऱ्या विदर्भ स्तरीय अधिवेशनात चंद्रपुर लोकसभा क्षेत्रातील व राजुरा विधान सभा क्षेत्रातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजुरा विधान सभा क्षेत्राचे समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार (Anandrao Angalwar) यांनी केले. (Nagpur)
भारत राष्ट्र समिती चे प्रचार यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात फिरत असून चंद्रपुर जिल्हा व लोकसभा क्षेत्रातील सर्वच विधान सभा क्षेत्रात पक्ष प्रवेशासाठी व सदस्य नोंदणीसाठी भारत राष्ट्र समितीची मोहीम सुरु आहे. राजुरा विधान सभा क्षेत्राचे समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांचे नेतृत्वात राजुरा, गोंडपिपरी, कोरपणा, जीवती तालुक्यात प्रचार यात्रा सुसज्ज गाडीने गावा गावात चौका-चौकातुन फिरत असून पक्षाचे धोरण घरोघरी जाऊन लोकांना पटवून सांगण्यात येत आहे. तालूका समिती सह शेतकरी समिती, युवक-युवती समिती, महिला समिती, ओ.बी.सी समिती, एस.सी. व एस.टी. मागासवर्गीय समिती, अल्पसंख्याक समिती, विद्यार्थी समिती तसेच समित्यांमार्फत गाव, पंचायत समीती, जि.प. व तालुका पातळीवर सदस्यता नोंदणी व पक्ष प्रवेश करत भारत राष्ट्र समितीचे प्रचार यात्रा सुरु आहे. (rajura)
या कार्यात राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय.अंगलवार सह संतोष कुळमेथे, रेशमा चव्हाण, अजय सकिनाला, सन्नी रेड्डी, ईसलाम शेख, जीवनदास चौधरी, नागेश ईटेकर, सुनिल साखलवार, मिनाक्षी मुन, अनसुर्या नुथी, ज्योती नळे, भिमराव जुमनाके, गणेश शेंबळे, अरविंद चव्हाण, किशोर मडावी, आशिष नामवाड, शंकर ईगडपलीवार इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.