आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत द्वारे
कोरपना (दि. २९ जून २०२३) -
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत आणि परिश्रम घेण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तेव्हाच आपला सर्वांगीण विकास होईल. आजचे गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे पुढील प्रतिबिंब आहे असे मत शेतकरी नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी कोरपना येथे धनोजे कुणबी समाज मंडळ तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी धनोजे कुणबी समाज मंडळाचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उत्तमराव मोहितकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक मनोहर पाऊनकर, राजुरा बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे, सर्च फाउंडेशनचे चेअरमन इंजि. दिलीप झाडे, अनिल डहाके, भैय्याजी मुडेवार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करण्यात आली. अँड. सातपुते यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे आयडल बनवून प्रेरक दृष्टीने आपली प्रगती साधली पाहिजे. समाज उन्नतीसाठी हातभार लावला पाहिजे असे मत व्यक्त केले. पाऊनकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्यातील खरे उपजत गुण बाहेर आनुन त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. तेव्हाच त्यांचा सर्वांगीन विकास होईल असे सांगितले. झाडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आपली करिअर घडवताना कुठल्याही एकाच दिशेने न जाता विविध विकासाच्या वाटा व संधी शोधल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यासोबतच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना समाज बांधवांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Korpana) (Meritorious students felicitated at Korpana)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज मंडळाचे सचिव विजय पानघाटे, संचालन प्राचार्य संजय ठावरी तर आभार सुनील देरकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व पुरुष, महिला समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाज मंडळ कोरपनाचे सर्व पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य लाभले. (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.