राजुरा (दि. २९ जून २०२३) -
श्री पंचमुखी नंदिगढ सेवा समिती हिरापूर तह. कोरपना येथे वामन महाराज पावडे यांच्या शेतात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर श्री विठू माऊली प्राण प्रतिष्ठा वामनबाबा पवाडे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. यावेळी बाहेर गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (Ashadhi Ekadashi) (Hirapur) (Korpana)
तीन दिवसापासून सुरू असलेल्या सोहळ्यामध्ये कलश स्थापना, हनुमान चालीसा पठण, जागृती भजन, जगन्नाथबाबा चरित्र अमृत पाठ पठण, पालखी सोहळा, कीर्तन सोहळा, दहीहंडी व समाज सेवा व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित माजी आमदार अँड. संजय धोटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वामन महाराज पावडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वामन महाराज यांचा व्यसनमुक्ती, सामाजिक प्रबोधन व त्यांच्या इतर सुरू असलेल्या कर्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी समाज सेवा व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार अँड. संजय धोटे (Adv. Sanjay Dhote), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, हिरापुरच्या सरपंच सौ. सूनिताताई तुमराम, उपसरपंच अरुण काळे, पोलिस पाटील योगिता टिपले, विरूर (गाडे.) उपसरपंच मारोती गोखरे, माजी सरपंच प्रमोद कोडापे, भाजपा नेते संजय मुसळे, निलेश ताजने, पत्रकार श्रीकृष्ण गोरे, विशाल पावडे, देवस्थानचे अध्यक्ष अनंता गोखरे, गणपत काळे, विशाल वांढरे, अमोल पावडे, नागोबा मडचापे, गोलु पावडे व बाहेर गावावरून आलेले भाविक भक्त व हिरापूर वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.(aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.