Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पावसात वाहून गेला गोवरी नालाचा रपटा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थी आणि वेकोलि कर्मचाऱ्यांना जाण्या येण्या करिता झाली गैरसोय आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २८ जून २०२३) -         गोवरी...
विद्यार्थी आणि वेकोलि कर्मचाऱ्यांना जाण्या येण्या करिता झाली गैरसोय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २८ जून २०२३) -
        गोवरी गावाजवळील नाल्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने याठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला रपटा मंगळवारी पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे राजुरा-गोवरी-कवठाळा मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा राजुरा तहसील मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. रपटा तुटल्याने पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळील मोठ्या नाल्यावरील पुलाचे काम सुरू झाले आहे. वाहतुकी करिता तात्पुरता रपटा तयार करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान अचानक हा रपटा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गोवरी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासनही संबंधित बांधकाम कंपनीने दिले होते. पण पाऊस सुरू झाला तरीही पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने पावसाच्या प्रवाहात सदर नाल्यावरील बनवलेला अस्थायी रपटा वाहून गेला. गोवरी मार्ग आज सकाळी बंद ठेवण्यात आला होता.. माहिती मिळताच पुन्हा मशिन बसवून मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. दुपारनंतर येथून पुन्हा वाहतूक सुरू झाली. गोवरीजवळ मोठ्या पुलाचे काम सुरू झाले आहे. पावसामुळे थोडा विलंब झाला आहे. हे बांधकामही पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. (There was inconvenience for students and public employees to come and go) (rajura)

विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची झाली गैरसोय
हा मार्ग राजुरा-कवठाळा वेकोलि परिसरातून जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, विद्यार्थी व वेकोलि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यांना पलीकडून लांबचा प्रवास करून राजुरा मुख्यालय गाठावेलागले. आता यानंतर अशी परिस्थिती ओढवू नये याकरिता त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top