Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रिमझिम पावसाने वातावरण सुखावले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाभट्टी वॉर्ड राजुरा पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता नाल्यांचे पाणी रस्त्यावर - बघा व्हिडीओ टीम - आमचा विदर्भ  राजुरा / बल्लारशाह / गडच...
चुनाभट्टी वॉर्ड राजुरा

पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता
नाल्यांचे पाणी रस्त्यावर - बघा व्हिडीओ
टीम - आमचा विदर्भ 
राजुरा / बल्लारशाह / गडचांदूर / विरूर स्टे. (दि. २६ जून २०२३) -
        उशिरा का होईना पण जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून रविवार पासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने वातावरण सुखावले आहे. रविवारी काही ठिकाणी धुंवाधार पाऊस झाला व रविवारच्या रात्रीपासूनच रिमझिम पाणी सुरु झाल्याने वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता मात्र आता पावसाने लावलेल्या हजेरीमुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Sowing is likely to begin) (Rajura / Ballarshah / Gadchandur / Wirur Stetion)

        चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागवडीला सुरुवात झाली. बऱ्याच भागात खरीप पेरणीला गती मिळाली आहे. पाऊस उशीरा आल्याने लांबलेल्या पेरण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापेल असा अंदाज नागपूर वेध शाळेने व्यक्त केला. 25 ते 27 जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

        राजुरातील चुना भट्टी वॉर्डात काल रविवारी दुपारी आलेल्या जोरदार पावसाने चोकप झालेल्या नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गडचांदूरातही काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top