Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारत राष्ट्र समिती च्या सदस्य नोंदणी अभियानाला मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद - आनंदराव अंगलवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारत राष्ट्र समितीची कोरपना तालुकास्तरीय बैठक गडचांदूरात संपन्न आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत (तालुका प्रतिनिधी) गडचांदूर (दि. २६ जून २०२३)...
भारत राष्ट्र समितीची कोरपना तालुकास्तरीय बैठक गडचांदूरात संपन्न
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत (तालुका प्रतिनिधी)
गडचांदूर (दि. २६ जून २०२३) -
        भारत राष्ट्र समिती ची प्रचारयात्रा राजुरा विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समितीचे समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांच्या मार्गदर्शनात, नियोजनात जोमाने सुरु असून राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात जात असून भारत राष्ट्र समिती च्या सदस्य नोंदणी अभियानाला मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मात्र येथेच न थांबता जोपर्यंत विजय मिळविता येणार नाही तो पर्यंत प्रत्येकानी याच प्रमाणे परिश्रम करण्याची गरज असल्याचे भारत राष्ट्र समितीचे समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांनी गडचांदूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत सांगितले. (Korpana taluka level meeting of Bharat Rashtra Samiti concluded in Gadchandur)

        भारत राष्ट्र समितीची कोरपना तालुकास्तरीय बैठक शासकीय विश्रामगृह गडचांदूरात नुकतीच संपन्न झाली. बैठकीत आसिफाबाद जिल्ह्याचे नेते  युनुस अकबानी, उद्धव कांबळे तसेच जिल्ह्यातील आशिष नामवाड, कृष्णा  चव्हाण, गोपाल ईराळे, अरविंद चव्हाण, ताराचंद राठोड, भागवत मोरे, शंकर पगडपल्लीवार, विठ्ठल कुसळे व अन्य पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकी दरम्यान शहरातील विविध पक्षातील कार्यकर्ते  कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षात भारत राष्ट्र समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. (K.C.R.) यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन प्रवेश घेतला. त्यानंतर गडचांदूर शहर महिला व पुरूष कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

        प्रास्ताविक आशिष नामवाड यांनी, मार्गदर्शन आनंदराव वाय. अंगलवार, युनूस अकबानी, उद्धव कांबळे यांनी केसी.आर. यांच्या शेतकरी, दुर्बल घटक, मागासवर्गीय तसेच अल्प संख्यकसमाजा करिता आखलेले धोरण, आगामी काळातील राष्ट्रीय  दुरदृष्टी याबाबतीत माहिती दिली. यावेळी कोरपना तालूका व गडचांदूर परिसरातील बहुसंख्य महिला व पुरूष कार्यकर्त्यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश घेण्याकरिता प्रेरित करण्यात आले. याप्रसंगी अजय सकिनाला, मिनाक्षी मुन व रेशमा चव्हाण सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top