आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जून २०२३) -
स्वतःच्या जिप निर्वाचन क्षेत्रा सोबतच संपूर्ण तालुक्यात विकास कामे खेचून आणणारे यशस्वी माजी जिप सदस्य तथा सभापती सुनील उरकुडे
(Sunil Urkude) यांनी आपल्या कारकीर्दीत राजुरा तालुक्याच्या ग्रामीण भागात जिपच्या माध्यमातून अनेक विकास कामे मंजूर केली. त्यात आर्वी येथील सरपंच व ग्राम वासियांची आरो ची मागणी करताच पक्ष भेद न करता त्यांनी आर्वी येथे आरो करीता जिल्हा निधी 2021-22 अंतर्गत रुपये पाच लाख मंजूर करून दिले. त्या आरो चे दिनांक 8 जून 2023 ला लोकार्पण माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पार पडले. (rajura)
राजकारणात कसलाही भेदभाव न करता सर्वसामान्य लोकांकरिता निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे सुनील उरकुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील इतर समस्येसाठी सुद्धा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी करण्यात आली, आपण राजुरा ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन यावेळी सुनील उरकुडे यांनी दिले.
यावेळी आर्वी येथील सरपंच शालूताई लांडे, माजी सरपंच सुधाकर महकुलकर, माजी उपसरपंच सुभाष काटवले, विजय उपरे, तंटा मुक्ती अध्यक्ष दादाजी जा, ग्रामसेवक तथा सूरज माथनकर आदींची उपस्थिती होती. (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.