Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्रद्धांजली सभेत अरुण धोटेंना अश्रु अनावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व.खा.बाळु धानोरकर यांना राजुरा काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण राजुरा (दि. १० जुन २०२३) -         चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खा...
स्व.खा.बाळु धानोरकर यांना राजुरा काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण
राजुरा (दि. १० जुन २०२३) -
        चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्वर्गीय बाळु धानोरकर यांना (Rajura Congress) राजुरा काँग्रेसच्या वतीने राजुरा येथे सकाळी ११ वाजता  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंनी (arun dhote) स्व.खा. धानोरकर (balu dhanorkar) यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळूभाऊ हे कार्यकर्त्यांना ऊर्जा पुरविणारे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी संघर्ष करणारे नेते होते. सर्वांना धीर आणि दिलासा देणारे नेते होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना अश्रु अनावर झाले. श्रध्दांजली सभेत उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (Shantanu Dhote) शंतनु धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, माजी सभापती कुंदा जेणेकर यासह अनेक कार्यकर्ते बाळुभाऊंच्या आठवणींनी भाऊक झाले. (rajura)

        या प्रसंगी कृ.उ.बा. समिती सभापती विकास देवाळकर, माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर कार्नेवार, अँड. अरूण धोटे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, यु.काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, अनंता ऐकडे, सुरेश पावडे, शंकरराव बोंकुर, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, कृ.उ.बा. समिती संचालक जगदीश बुटले, अनिल आलाम, बाळू पतंगे, सय्यद साबीर, वर्षा कानकाटे, कामिना उईके, नंदाताई गेडाम, इंदूताई निकोडे, पुनम गिरसावळे, योगिता भोयर यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top