Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: झाड कोसळून महिलेचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा महावितरण चे मोठे नुकसान कोडशी बू, कोडशी खू, गांधीनगर, तुळशी, हेटी येथील वीज पुरवठा खंडित कोरपना - हातलो...
कोरपना तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा
महावितरण चे मोठे नुकसान कोडशी बू, कोडशी खू, गांधीनगर, तुळशी, हेटी येथील वीज पुरवठा खंडित
कोरपना - हातलोनी मार्गावर झाड कोसळले - मार्ग बंद
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १० जुन २०२३) -
        तालुक्याला आज दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला. (Korpana)
        तालुक्याला आज दुपारी प्रचंड वारा व वादळी पावसाचा तडाखा बसला यामुळे कोरपना - हातलोनी मार्गावर झाड कोसळल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली. आज दुपारी 02:30 वाजताच्या सुमारास कोडसी (बु) यथे वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले असून त्या मध्ये रस्त्या लगत असलेली झाडें, गावातील इलेक्ट्रिक पोल, कित्येकाचा घरांची छपरे, शेतीसाठी आणलेले खत याचे अतोनात नुकसान झाले आहेत. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top