Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सोयाबीन पिकाच्या अष्टसुत्रीचा अवलंब करून उत्पादकता वाढविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तालुका कृषी अधिकारी आर.जी. डमाळे कोरपना यांचे आवाहन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी कोरपना (दि. ६ जून २०२३) -         सोयाबीन पिकाच...
तालुका कृषी अधिकारी आर.जी. डमाळे कोरपना यांचे आवाहन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी
कोरपना (दि. ६ जून २०२३) -
        सोयाबीन पिकाची पेरणी उत्तम प्रकारे होवून त्याचा फायदा शेतकऱ्याना व्हावा तसेच पिकाची गुणवत्ता, भरणा, व पिकात वाढ होण्या करीता औषधी चा वापर करावा या करिता शंकर तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनी तयार केलेल्या अष्ष्टसूत्रीचा वापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, कोरपना यांनी केले आहे. (Taluka Agriculture Officer R.G. Appeal of Damale Korpana)

        घरगुती सोयाबीनची प्रतवारी करणे. साधारणपणे 65 ते 70 टक्के सोयाबीन बियाणे घरचे वापरले जाते. ते बियाणे स्पायरल सेपरेटरचा वापर करून बियाणांची प्रतवारी करून घ्यावी. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासनी करूनच पेरणी करावी. घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी करीत असताना, पेरणीसाठी वापरणारे बियाणांचे एकुण 100 दाणे ओल्या गोणपाटावर घेऊन त्याची गुंडाळी करावी किंवा शेतामध्ये 100 दाणे रुजवून, पाच ते सहा दिवसांमध्ये त्याची झालेली उगवण तपासावी. जर 100 दाण्यांपैकी 70 दाने उगवलेले आढळून आलेस ते बियाणे पेरणीसाठी योग्य समजावे. जर उगवून आलेल्या दाण्यांची टक्केवारी कमी असेल तर पेरणीसाठी वापरावयाच्या बियाणांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. (Korpana)
  • 70% उगवण असलेस 30 किलो बियाणे वापरावे
  • 68% उगवण असलेस 31 किलो बियाणे वापरावे
  • 66% उगवण असलेस 32 किलो बियाणे वापरावे
  • 64% उगवण असलेस 33 किलो बियाणे वापरावे
  • 62% उगवण असलेस 34 किलो बियाणे वापरावे
  • 60 % उगवण असलेस 35 किलो बियाणे वापरावे
  • 60% पेक्षा कमी उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नये.
बियाणांची बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, बिज प्रक्रिया मुळे पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, बियाणेची उगवण शक्ति मधे वाढ होते. रायझोबियमच्या बिज प्रक्रिया मुळे हवेतील नत्र पिकाला उपलब्ध होणे साठी मदत होते व स्फुरद विरघळविणारे जिवाणूंमुळे जमिनीतील स्फुरद पिकाला शोषण करण्याच्या अवस्थेत उपलब्ध करून देण्याचे काम करतात त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते.

        रासायनिक बिज प्रक्रिया व जैविक बिज प्रक्रिया अशी दोन प्रकारची बिज प्रक्रिया असलेमुळे, बिज प्रक्रिया करताना FIR या तंत्राचा वापर करावा. म्हणजे प्रथम FUNGICIDE नंतर INSECTICIDE व नंतर RHIZOBIUM ची बिज प्रक्रिया करावी.
 
        मुळकुज व खोडकुज नियंत्रणासाठी कार्बाॅक्झिन 75% W.P. 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कार्बाॅक्झिन 37.5% + थायरम 37.5% 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बिज प्रक्रिया करावी.

        खोडमाशी नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम 30% एफ एस 10 ml प्रती किलो, याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी.
 नत्र स्थिरीकरण व स्फुरद उपलब्धतेसाठी रायझोबियम 25 ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू 25 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

         पेरणीसाठी शक्यतो दहा वर्षांच्या आतील वाणांची निवड करावी. सलग 2 ते 3 दिवस 75 mm ते 100 mm पाऊस अथवा जमीनिमधे 4 ते 6 इंच खोलीपर्यंत ओल आसलेनंतर वाफसा आले नंतर पेरणी करावी. BBF यंत्राने पेरणी केलेस एकरी 22 किलो प्रति एकर बियाणे लागते तर सरी वरंब्यावर पेरणी केल्यास एकरी 15 ते 16 किलो बियाणे लागते. व उत्पन्नामध्ये वाढ होते. पेरणी ही उताराला आडवी करावी.
 
        सोयाबीनची पेरणी 3 ते 5 सेंटिमीटर खोल करावी व खत बियाणापासून 5 सेंटिमीटर खोल पडावे. ट्रॅक्टर द्वारे पेरणी करताना, ट्रॅक्टरचा वेग हा 5 Km प्रती तास असावा.तरच योग्य खोलीवर बियाणे पडेल. साध्या पेरणी यंत्राने , पेरणी करताना प्रत्येक सहा ओळीनंतर 60 सेंटिमीटर रुंदीची खोल मृत सरी पाडावी.
 
        प्रती एकर युरीया 26 कीलो + सिंगल सुपर फॉस्फेट 150 कीलो + म्युरेट आॅफ पोटॅश 20 किलो + गंधक 8 कीलो. याप्रमाणे द्यावे. किंवा नत्र 12 किलो + स्फुरद 30 किलो + पोटॅश 12 किलो + गंधक 8 किलो याप्रमाणे प्रती एकर खतांची मात्रा द्यावी.गळितधान्य पिकांमध्ये तेलाचे उत्पादन अधिक आसने साठी गंधक देणे आवश्यक आहे.
 
        तणनाशकांची फवारणी नॅपसॅक स्प्रे पंपाद्वारेच करावी. तणनाशक फवारणीसाठी गढुळ पाणी वापरू नये. फवारणीचे पाणी आम्लधर्मी असावे, फवारणीचे पाणी अल्कधर्मी असलेस त्यामध्ये सिट्रिक अॅसीड मिसळून ते आम्लधर्मी करावे. ही पद्धत वापरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकात वाढ करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top