Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वंचितने तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी करत केले आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसीलदार चर्चेसाठी तयार नसल्याने केले ठिय्या आंदोलन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १० जून २०२३) -         राजुरा तहसील कार्यालय...
तहसीलदार चर्चेसाठी तयार नसल्याने केले ठिय्या आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जून २०२३) -
        राजुरा तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी करत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी सत्याग्रह आंदोलन केले. मात्र तहसीलदार चर्चेसाठी तयार नसल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले, आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरातच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदोलन चिघळत असताना तहसीलदारांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत चार दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. (Vanchit Bahujan Aghadi) (Tehsil Office Rajura)

        कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचितचे चंद्रपुर जिल्ह्यातील नेते तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे (Bhushan Phuse) मैदानात उतरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बी-बियाणांचा काळा बाजार सुरू असून कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच फवारणी औषध व खतांच्या किमतीत शासनाने भरमसाठ वाढ केली असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

        केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नसून वंचित बहुजन आघाडीने रोष व्यक्त करत तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाच्या धोरणांचा निषेध केला.तसेच तहसील कार्यालय परिसरात कापसाची होळी करण्यात आली. बोगस बी बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्यावर कारवाई करा, शेतकऱ्यांना बी बियाणे 50 टक्केवर उपलब्ध करून द्या, अन्यथा व्यापाऱ्यांच्या गोडावूनला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे यांनी दिला आहे. (rajura) (aamcha vidarbha)

        यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गोरकार, गोंडपिपरी तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, युवा कार्यकर्ते अभिलाष परचाके यांच्यासह वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top