Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुसंस्कार शिबीर आदर्श पिढी घडविण्याचे उत्तम माध्यम - ॲड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा फाटा येथे सुसंस्कार मार्गदर्शन मेळावा  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २२ मे २०२३) -         आजचे युग स्पर...
नांदा फाटा येथे सुसंस्कार मार्गदर्शन मेळावा 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २२ मे २०२३) -
        आजचे युग स्पर्धेचे युग असुन सुसंस्कार अत्यंत गरजेचे आहे. आदर्श पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुसंस्काराचे धडे घ्यावे असे मत विदर्भवादी नेते माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले नांदाफाटा येथील श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिरात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिबिराचे संयोजक हभप विठ्ठल ठाखरे महाराज, हिरापूर येथील उपसरपंच अरुण काडे, आवरपुर येथील उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर बोडखे, रत्नाकर चटप आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना (Adv. Vamanrao Chatap) अँड. चटप म्हणाले गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य गावागावात असून गेल्या पंचवीस वर्षापासून कोरपना तालुक्यात नांदाफाटा आणि बाखर्डी येथे जवळपास 300 विद्यार्थी दरवर्षाला शिबिरामध्ये प्रवेश घेतात. यातून अनेक विद्यार्थी अधिकारी झालेले असून समाजात मूल्य शिक्षण देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून सुसंस्कार शिबिराचे कार्य सुरू आहे. यापुढेही शिबिरांची संख्या वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना सदर शिबिराचा लाभ कसा घेता येईल याकडे गुरुदेव सेवा मंडळाने लक्ष द्यावे. भविष्याची पिढी घडवण्याचे माध्यम सुसंस्कार शिबिर असल्याचेही ते म्हणाले . शिबिरासाठी गेला 25 वर्षापासून श्री शिवाजी इंग्लिश स्कूल तथा जुनियर कॉलेज ची इमारत विनामूल्य देणाऱ्या या शाळेचे संस्थापक रवींद्रलाल श्रीवास्तव, अध्यक्ष शामसुंदर राऊत, सचिव पौर्णिमा श्रीवास्तव व पदाधिकाऱ्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख यावेळी चटप यांनी केला. संचालन धनंजय डाखरे यांनी केले यावेळी शिबिरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Susanskar guidance meeting at Nanda Phata) (Āmachā vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top