Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संतोषसिंह रावत गोळीबार प्रकरण - त्या आरोपींना पाच दिवसांचा पीसीआर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हाय प्रोफाईल कनेक्शन असण्याचा पोलिसांना संशय आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २४ मे २०२३) -         काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ...
हाय प्रोफाईल कनेक्शन असण्याचा पोलिसांना संशय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २४ मे २०२३) -
        काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत हयांचेवर मुल येथे 11 मे रोजी रात्रीच्या वेळी स्विफ्ट कार मधुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. नशीब बलवत्तर म्हणून ह्या गोळीबारात संतोष रावत ह्यांना गोळी केवळ चाटून गेली. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरले होते. (Chandrapur) (aamcha vidarbha)

        ह्या आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. सर्वपक्षीय राजकीय दबाव व नागरिकांचा रेटा ह्यामुळे अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ह्यांनी गडचांदुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांचेकडे तपास सोपविला. त्यांनी अत्यंत नियोजनबध्द तपास करून चंद्रपूर येथुन यादव बंधूंना अटक केली. आज चंद्रपूर न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले असुन न्यायालयाने दोन्ही आरोपींचा पाच दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. (Congress) (Chandrapur District Central Cooperative Bank)

        दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे मात्र ह्या घटनेमागे मास्टर माईंड कोण? त्यांच्याकडे पिस्तूल कशी आली? त्यांना ती कोणी पुरविली ह्यासह हत्येचा प्रयत्न करण्याचे नेमके कारण काय ह्याचा शोध घेणे गरजेचे असून समाज माध्यमांवर ह्या प्रकरणात राजकीय धागेदोरे असल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात असुन काँग्रेस पक्षाच्या एका वजनदार नेत्याकडे इशारा केल्या जात आहे.


        ह्या अनुषंगाने पिडीत संतोष सिंह रावत ह्यांनी एका व्हिडिओ द्वारे दोन्ही आरोपींची तसेच आपलीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असुन ह्या गोळीबारामागे राजकीय शक्ती असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज भासल्यास आपण स्वतः ह्या प्रकरणातील सूत्रधाराचे नाव घोषित करू असेही सांगितले आहे हे विशेष.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top