Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांचे शहीदी गुरु पर्वावर सामाजिक कार्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजीव गांधी चौकात शरबत व चना वितरण आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २४ मे २०२३) -         शिखांचे पाचवे गुरू श्...
राजीव गांधी चौकात शरबत व चना वितरण
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २४ मे २०२३) -
        शिखांचे पाचवे गुरू श्री अर्जुन देवजी महाराज यांच्या शहीद दिनानिमित्त गडचांदूर येथे 23 मे रोजी स्थानिक पेट्रोल पंप (राजीव गांधी) चौकात गुरुद्वारा साध संगत कमिटी गडचांदूरच्या वतीने थंड सरबत व चना प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा प्रवाशांनी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने लाभ घेतला. (Gadchandur) (Martyrdom Day of Shri Arjun Devji Maharaj, Fifth Guru of Sikhs)

        यावेळी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे संस्थापक सरदार परमिंदर सिंग सचदेव, पृथवीराज खुराणा, हंसराज चौधरी, विवेक येरणे, सेवानिवृत्त प्रा.अशोक डोईफोडे, राकेश अरोरा, प्रदीप गुडेलीवार, गोपाल सिंग सचदेव, करण सिंग, ओमकार सिंग, अजयपाल सिंग, स्तवन सिंग, इंदरसिंग, बिबी निर्मल कौर, बिबी जीवन कौर, बिबी करीश्मा कौर यांच्यासह प्रबंधक कमिटीचे युवक, युवती व इतरांची उपस्थिती होती. याच बरोबर सायंकाळी रहिरास साहेब, गुरबाणी कीर्तन, अरदास, गुरू का लंगर असे कार्यक्रम आयोजित करण्यात  आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करत असल्याचे चित्र असून भविष्यातही हे पर्व अशाच प्रकारे वर्षानुवर्षे सुरू राहावे, असे मत गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गुरुद्वारा साध संगत कमिटी गडचांदूर च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top